आपण वेगाने चाललो किंवा पळलो की आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात. तसे आपल्याला जाणवते देखील. इतकेच काय कोणतीही तणावाची परिस्थीती उद्भवली किंवा परीक्षेचा काळ असेल किंवा कोणी रागवले, चिडले तरी अनेकांच्या ह्रदयाचे ठोके पटकन वाढतात. भितीपोटी माझी छाती धडधडत आहे असे त्यावेळी आपण सहजपणे म्हणून जातो. पण अशा वेळी छातीचे ठोके किती पटीने वाढलेले असतात तसेच ते किती असतात याची माहिती काही आपल्याला नसते. पण आता ते शक्य होणार आहे. कारण हृदयाच्या ठोक्यांीचे निरीक्षण करणारे व वापरण्यास सोपे असलेले स्वयंऊर्जानिर्मित उपकरण शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. तीव्र प्रकाशात हे यंत्र कार्यान्वित होते. या उपकरणात ऑरगॅनिक इलेक्ट्रो केमिकल ट्रान्झिस्टर म्हणजेच एक प्रकारचे इलेक्ट्रॉ निक यंत्रणा बसविण्यात आली आहे. Chest beats can now be easily measured
जैविक कार्यपद्धतीचे लवचिक सेंद्रिय सौर सेलमध्ये मोजमाप केले जाते. याचा उपयोग करीत स्वच्छ प्रकाशात मानव व उंदरांच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी केला. हे यंत्र मानवाच्या त्वचेवर किंवा उतीवर लावता येते. वैद्यकीय दृष्टीने हे महत्त्वाचे उपकरण आहे. मानवी शरीरातील हृदय व मेंदूच्या कार्याचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर शारीरिक सेन्सर म्हणून करता येतो. या उपकरणाच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके नियमितपणे व अत्यंत सुलभरित्या मोजणे, त्याचा अभ्स करणे सहज शक्य होणार आहे. त्यादृष्टीने हे यंत्र पुढचे पाउल ठरणार आहे यात शंका नाही. ज्यांच्या ह्रदयाचे ठोके अनियमित असतात त्यांना ते मोजण्यासाठी या यंत्राचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल अशी संशोधकांना खात्री आहे. शिवाय याची किंमतदेखील फार जास्त नसणार आहे. तसेच हे उपकरण वापरण्यासदेकील सोपे असल्याने अनेक जण त्याचा वापर करू शकतील अशी संशोधकांना खात्री आहे.