• Download App
    मेंदूचा शोध व बोध :  मेंदूची क्षमता तब्बल अडीच पेटाबाईट । Brain Discovery and Enlightenment: The capacity of the brain is about two and a half petabytes

    मेंदूचा शोध व बोध :  मेंदूची क्षमता तब्बल अडीच पेटाबाईट

    तुम्हाला माहितीय आपला मेंदू मेंदू किती जीबी चा आहे? मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट. एक पेटाबाईट म्हणजे तब्बल १००० टेराबाईट. तर
    एक टेरा बाईट म्हणजे १००० जीबी. म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले एक लाख ५६ हजार फोन! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. Brain Discovery and Enlightenment: The capacity of the brain is about two and a half petabytes

    आपल्या मेंदूमध्ये एक दहा हजार कोटी मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन्स असतात. आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे हजार किलोमीटर एवढी होईल. पण न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुळे ते आपल्याला दिसणारच नाहीत. आयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या बदलांची ढोबळपणे गर्भावस्थेतील, बाल्यावस्थेतील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील व वृद्धावस्थेतील मेंदू असे पाच टप्प्यात विभागणी करणे शक्य आहे. यातील प्रत्येक अवस्थेतील मेंदू आपल्या वर्तनावर परिणाम घडवणारा असून त्यामुळे आपल्या जीवनशैलीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता त्यात असते.

    पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर मज्जानलिकेत परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते.

    Brain Discovery and Enlightenment: The capacity of the brain is about two and a half petabytes

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!