• Download App
    इवल्याश्या पक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा तुफान प्रवास। A stormy journey of thousands of kilometers of birds

    इवल्याश्या पक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा तुफान प्रवास

    आपल्या महाराष्ट्रात रशियातील सैबेरिया प्रांतातून दरवर्षी सैबेरियन क्रोंच हे पक्षी हजारो किलोमीटर उडत उडत स्थलांतर करुन येतात. हे स्थलांतर कायमस्वरुपी नसते. काही विशिष्ट काळासाठी ते दुसऱ्या प्रदेशात जातात. त्यानंतर पुन्हा ते आपल्या मुळ प्रदेशात जातात. इवलासा पक्षी हजारो किलोमीटर उडत प्रवास करतो ही थक्क करणारी प्रक्रिया आहे. हे सुदंर व नजाकतदार पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत दूर दूरच्या देशात येतात. सैबेरियात प्रतिकूल थंड वातावरणात टिकाव न लागल्याने ते भारतासारख्या उष्ण प्रदेशात येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हा मोठा कुतूहलाचा विषय मानला जातो. A stormy journey of thousands of kilometers of birds

    कोणत्याही प्रदेशातील वातावरण हे नेहमी बदलत असते. त्यामुळे त्यानुसार पक्ष्यांनाही जुळवून घ्यावे लागते. निसर्गातील या ऋतूचक्रानुसार त्यांचे स्थलांतर ठरते. पाणी व अन्नासाठी पक्षी दरवर्षी नित्यनियमाने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. प्रत्येक प्रदेशांत ऋतुमानानुसार फरक पडत असतो. तेथील तापमान बदलत असते, पावसाचे प्रमाण बदलते. पर्यावरणातील हे बदल पचवून टिकून राहण्यासाठी पक्षी स्थसांतर करतात. वातावरण बदलले की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांच्या स्त्राव होवू लागते. तो त्यांना उडत दूर जाण्यासाठी प्रेरणा देतो. स्थलांतरासाठीचा प्रदेश या पक्ष्यांनी पूर्वीच ठरवलेला असतो. म्हणजे ते लहान असताना ज्या प्रदेशात जात असतात तेथेच ते मोठे झाल्यावरही जातात. त्यामुळे त्यांची निश्तिच वहिवाट ठरलेली असते.

    पक्षी थव्याने स्थलांतर करतात. दूर उडत जाण्यासाठी त्यांना शरिरीक तयारी करावी लागते. त्यासाठी पुरेसे अन्न खावून ते चरबी साठवतात. त्याशिवाय त्यांना स्थलांतर करता येत नाही. स्थलांतर करताना पक्षी प्रामुख्याने सहा ते आठ हजार मीटर उंचावरुन उडतात. सतत उडत राहण्याने शरीराचे जे तापमान वाढलेले असते त्याचा निचरा करण्यासाठी ही उंची पक्ष्यांना उपयुक्त ठरते. काही पक्षी काही किलोमीटर तर काही पक्षी हजारो किलोमीटर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षात पृथ्वीवरील बदलत्या वातावरणामुळे तसेच शहरांतील वाढत्या प्रदूषणामुळे पक्ष्यांना स्थलांतर करताना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

    A stormy journey of thousands of kilometers of birds

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!