Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मृत महिलेच्या खात्यात 10 लाख कोटींची रक्कम; बिहारच्या एका प्लंबरच्या खात्यातही इतके पैसे
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात १० लाख कोटींहून अधिक रुपये जमा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. नोएडामधील एका मृत महिलेच्या खात्यात १० लाख १ हजार ३५६ लाख कोटींहून अधिक (१००१३५६००००००.०००१००२३५६) रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. महिलेच्या मुलाने त्याच्या मोबाईलवर मेसेज पाहिल्यावर तो बँकेत पोहोचला.