• Download App
    शाहीनबाग : अपप्रचाराच्या आंदोलनाचा "क(रुण)रोना" अंत; पोलिसांनी शाहीनबाग रिकामी केली | The Focus India

    शाहीनबाग : अपप्रचाराच्या आंदोलनाचा “क(रुण)रोना” अंत; पोलिसांनी शाहीनबाग रिकामी केली

    विशेष   प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शाहीनबागेत चाललेले आंदोलन आज सकाळी पोलिसी कारवाई करून गुंडळले. अपप्रचाराच्या या आक्रस्ताळ्या आंदोलनाचा असाच करुण अंत होणे अपरिहार्य होते. दिल्लीसह देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. पोलिसांनी आंदोलकांना शाहीनबाग रिकामी करण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती धुडकावली. त्यानंतर पोलिसी कारवाई करत अर्ध्या तासात शाहीनबाग रिकामी करण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. अर्थात आज सकाळी जे घडले ते अपरिहार्य होते. एक तर संसदेने बहुमताने संमत केलेल्या सीएए कायद्याविरोधात हे आंदोलन अपप्रचारातून उभे राहिले होते. आंदोलन १०० दिवसांपेक्षा अधिक चालविले होते. शाहीन बागेत बसलेले बाहेरच्या शक्तींच्या हातातले खेळणे असल्यासारखे आंदोलन चालवत होते.

    दिल्लीतील निवडणूक संपल्यावर त्याचे राजकीय महत्त्व संपुष्टात आले होते. तरीही आंदोलन मागे घेण्यात आले नाही. देश एकजुटीने कोरोना विरोधात लढत असताना आंदोलन चालू ठेवल्याने उरली सुरली सहानुभूती देखील आंदोलकांनी गमावली होती. त्यामुळे पोलिसी कारवाई करून शाहीनबाग गुंडाळावी लागली. मूळात भूसभुशीत पायावर उभ्या केलेल्या या आंदोलनाचा असा करुण “करोनामय” अंत होणे अपरिहार्य होते.

    Related posts

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!

    (नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाट्टेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकावा!!; लिबरल पत्रकारांचा नवा “उद्योग”!!

    मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतरही पवार संस्कारितांचीच भांडणे चव्हाट्यावर; फडणवीसांना धक्का लावण्यात अपयश आल्याबद्दल चडफडाट!!