• Download App
    'मरकज'मधून कोरोना घेऊन आलेले सव्वाशेपेक्षा जास्त मुस्लीम महाराष्ट्रात? पुण्यातून उपस्थित होते 40 मुस्लीम | The Focus India

    ‘मरकज’मधून कोरोना घेऊन आलेले सव्वाशेपेक्षा जास्त मुस्लीम महाराष्ट्रात? पुण्यातून उपस्थित होते 40 मुस्लीम

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी मरकज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सुमारे 136 मुस्लीम गेले होते. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर यातले बहुतेकजण महाराष्ट्रात परतले असून पुणे, सोलापुर, औरंगाबाद, नांदेड अशा राज्याच्या विविध भागातील आपापल्या निवासस्थानी किंवा मदरसे आणि मशिदींमध्ये परतले. यांच्यामुळे महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या साथीचा सामाजिक प्रसार (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची भीती निर्माण झाली आहे.

    तबलीगी मरकजचा कार्यक्रम दिल्ली येथे मुस्लीम धर्मप्रसारासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देश-विदेशातून 15 हजारांपेक्षा जास्त मुस्लीम आले होते. या कार्यक्रमात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याची भीती आहे. कार्यक्रमानंतर आपापल्या राज्यात परतलेल्या या मुस्लीमांचा शोध चालू करण्यात आला आहे. मात्र यालाही काही कट्टर मुस्लीम विरोध करत असून वैद्यकीय तपासणीसाठी मशीद-मदरशांमध्ये जाऊ पाहणार्या डॉक्टरांना विरोध केला जात आहे.

    मरकजमध्ये सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील 40 लोकांना पोलिसांनी आतापर्यंत शोधून काढल्याची माहिती आहे. पोलिसांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यात पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील मुस्लीमांचा समावेश आहे. यातील 32 जण पिंपरीतले आहेत. केंद्र सरकारने देशातल्या प्रत्येक राज्याला दिल्लीतील कार्यक्रमाला सहभागी झालेल्या मुस्लिमांची नाव-पत्त्यासह यादी कळवली आहे. त्यानुसार तपास यंत्रणा शोध घेत आहेत. मात्र वैद्यकीय कारणांसाठी चालू असलेल्या या तपासात कट्टरपंथीय अडथळे आणत असल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यातील काही जणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधली आहे.

    Related posts

    (नसलेल्या) सूत्रांच्या हवाल्याने वाट्टेल ते व्हिडिओ बनवा; कसेही करून भाजपच्या फांद्यांना ठाकरे लटकावा!!; लिबरल पत्रकारांचा नवा “उद्योग”!!

    मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतरही पवार संस्कारितांचीच भांडणे चव्हाट्यावर; फडणवीसांना धक्का लावण्यात अपयश आल्याबद्दल चडफडाट!!

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46