विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारला उद्याच विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने आज सायंकाळी दिले्. काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार सभागृहात येऊ इच्छित असतील, तर त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, असे आदेशही न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वा खालील खंडपीठाने दिले. कमलनाथ यांनी बहुमत गमावल्याने उद्या विधानसभेत सरकारचा पराभव होऊ शकतो किंवा येडियुरप्पा, कुमारस्वामी यांच्या सारखे शक्तिपरीक्षणापूर्वीच कमलनाथ राजीनामा देऊ शकतात.