विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजना प्रशंसनीय आहेतच. पण तेथे नुसते लॉकडाऊन उपयोगी ठरणार नाही, तर त्या पलिकडे जाऊन उपाय योजले पाहिजेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिला आहे. लॉकडाऊन केल्यानंतर प्रत्येक संशयित रुग्णावर लक्ष ठेवले पाहिजे. त्याची तपासणी करून क्वारंटाइन केले पाहिजे. काही ठिकाणी लोक क्वारंटाइन मधून पळून जात असल्याच्या घटना घडत आहेत, त्याने संसर्गाचा धोका वाढतो. हे लक्षात घेत आता कठोर कारवाईची वेळ आली आहे, असे WHO ने म्हटले आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती त्याचे परिणाम लवकरच दिसतील पण त्याच बरोबर लॉकडाऊन संपले की लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर येतील, ते देखील टाळले पाहिजे. यासाठी सिंगापूरचे उदाहरण प्रत्येक देशाने डोळ्यासमोर ठेवावे, असेही WHO ने स्पष्ट केले.
असा आहे कोरोनाचा प्रादुर्भाव