विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाच्या कानाकोपर्यातून कोरोना विरोधात आज सायंकाळी शंखनाद उमटला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला अवघ्या देशाने न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद देऊन कोरोनाविरोधात टाळीनाद, थाळीनाद घंटानाद, शंखनाद केला. देशबांधवांनी घराघरात, गच्चीत उभे राहून आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या संकटातही झटणार्या लाखो अधिकारी, कर्मचार्यांसाठी कृतग्यता व्यक्त केली. सायंकाळी ५ ते ५.०५ पर्यंत देशात फक्त आणि फक्त कृतग्यतेचा आणि कोरोना विरोधातील लढाईचाच आवाज येत होता. अवघा हिंदूस्थान एक आहे आणि याच एकजूटीने कोरोनाच काय पण कोणत्याही आस्मानी संकटाचा मुकाबला हिंदुस्थानी एकजूटीनेच करतील, असा प्रचंड आत्मविश्वास सायंकाळच्या अवघ्या पाच मिनिटांनी देशबांधवांनी दिला.
काशी विश्वनाथाच्या मंदिरातून, अयोध्येच्या रामलल्लांच्या अस्थायी मंदिरातून, दक्षिण भारतातील सर्व प्रसिद्ध मंदिरामधून शंखनाद, तासनाद, झांजनाद, टाळीनाद करण्यात आला. चर्चमधून घंटानाद करण्यात आला. कोणतेही संकट आले की अवघा देश कसा एकवटतो, याची प्रचितीच यातून आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या घरातून थाळीनाद, टाळीनाद करीत कोरोनाच्या संकटात जनतेसाठी झुंजणार्या लाखो अधिकारी, कर्मचार्यांसाठी कृतग्यता व्यक्त केली.
लम्बी लड़ाई की शुरुआत..’
ये धन्यवाद का नाद है, लेकिन साथ ही एक लंबी लड़ाई में विजय की शुरुआत का भी नाद है। आइए, इसी संकल्प के साथ, इसी संयम के साथ एक लंबी लड़ाई के लिए अपने आप को बंधनों (Social Distancing) में बांध लें।
आज का #JantaCurfew भले ही रात 9 बजे खत्म हो जाएगा, लेकिन इसका मतलब यह नहीं है कि हम सेलिब्रेशन शुरू कर दें। इसको सफलता न मानें। यह एक लम्बी लड़ाई की शुरुआत है। आज देशवासियों ने बता दिया कि हम सक्षम हैं, निर्णय कर लें तो बड़ी से बड़ी चुनौती को एक होकर हरा सकते हैं।
केंद्र सरकार और राज्य सरकारों द्वारा जारी किए जा रहे निर्देशों का जरूर पालन करें। जिन जिलों और राज्यों में Lockdown की घोषणा हुई है, वहां घरों से बिल्कुल बाहर न निकलें। इसके अलावा बाकी हिस्सों में भी जब तक बहुत जरूरी न हो, तब तक घरों से बाहर न निकलें।
: नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री
मोदींच्या आवाहनानंतर देशवासीयांनी उस्फूर्त जनता कर्फ्यू पाळला. मोठ्यातल्या मोठ्या शहरापासून ते छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये बंद पाळण्यात आला. कोरोनाला हरविण्याचाच हा जबरदस्त निर्धार करोडो नागरिकांनी दाखविला.
त्याला तोड नव्हती. १९६५ साली देशात अन्नाचा तुटवडा होता. पाकिस्तानने भारतावर युद्ध लादले होते. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांनी देशातील नागरिकांना दर सोमवारी एक वेळेचे जेवण न घेता उपवास करण्याचे आवाहन केले होते, त्यावेळी करोडो नागरिकांनी शास्रीजींच्या आवाहनाला असाच उस्फूर्त प्रतिसाद देऊन देशाचे करोडो टन अन्न वाचविले होते. त्यावेळी नागरिकांनी जो निर्धार दाखविला होता, तसाच निर्धार आज मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी दाखविला.