विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसविरुध्द लढाईचे उदाहरण भारताने जगाला घालून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीचे सार्क देशांनी कौतुक केले आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारताने कोरोना व्हायरसचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. सर्वांनी एकत्र राहून या विषाणूंचा सामना करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
कोरानाने बाधत झालेल्या दक्षिण अशियाई प्रदेशाला भारताने मानवी भावनेतून मदत केलीआहे. त्यांना आर्थिक, वैद्यकीय आणि राजनैतीक पातळीवर मदत दिली. कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईचे विशेष अनेक गोष्टींसाठी आहे. भारत आणि चीन यांच्यात ३४८८ किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही देशापेक्षा चीनकडून आलेल्या या साथीचा भारताला सर्वाधिक धोका होता.
मात्र, तरीही भारतात आतापर्यंत केवळ १३० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. भारत हा जगातील एकमेव देश आहे की ज्याने इतर कोरानाग्रस्त देशांतून आपल्या नागरिकांची सुटका केली. वुहान या कोरानाच्या माहेरघरातून भारतीय हवाई दलाने स्वत:च्या जीवाववर उदार होत ७२३ भारतीय आणि ३७ परदेशी नागरिकांची सुटका केली. जपानमधून ११९ भारतीयांना मायदेशात आणण्यात आले.
कोरोनाच्या तपासणीसाठीची सर्वात सुरक्षित यंत्रणा भारताने उभारली आहे. भारतात कोरानाची तपासणी करणाऱ्या ५६ प्रयोगशाळा उभारल्या आहेत. यामध्ये भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांचीही तपासणी केली जाते. तपासणीच्या अहवालासाठी लागणारा १२ ते १४ तासांचा वेळ भारतीय शास्त्रज्ञांनी चार तासांवर आणला आहे. त्यामुळे इराण, अफगणिस्थानसारखे देशही भारताला आपल्या देशात प्रयोगशाळा उभारून द्याव्यात यासाठी विनंती करत आहेत. त्याप्रमाणे भारताने इराणमध्ये प्रयोगशाळा उभारली असून भारतीय शास्त्रज्ञांची टीमही तेथे कार्यरत आहे. त्याचबरोबर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाने खास विमाने पाठविली. भारतीय लष्कराने जैसलमेर येथील तळावर त्यांच्यासाठी विलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उभारली. याठिकाणी त्यांच्यावर उपचारही केले जात आहेत.
कोरोनाने सर्वाधिक हा:हा:कार माजविलेल्या चीनला भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आत्तापर्यंत भारताने मास्क, ग्लोव्हज आणि औषधे अशी १५ टन मदत चीनला पाठविली आहे. त्याचबरोबर आवश्यक वैद्यकीय उपकरणेही पाठविली आहेत. मालदीवच्या नागरिकांना मदतीसाठीही भारताने १४ सदस्यांचे वैद्यकीय पथक पाठविले आहे.
भारताने परदेशातून आलेल्या तब्बल सव्वा लाख नागरिकांची विमानतळावर आणि बंदरांवर तपासणी केली. यासाठी ३० विमानतळ आणि ७७ बंदरांवर यंत्रणा उभारण्यात आली होती. कोरोनाग्रस्त देशांतून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणासाठी सुविधा उभारण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपासून परदेशातून येणाऱ्या भारतीयांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे. यामुळे परदेशातून येणाऱ्यांकडून पसरणाऱ्या संसंर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. सार्क देशांनी भारताच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. कोरानाविरुध्द लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इमर्जन्सी फंडचाही प्रस्ताव सार्क देशांपुढे ठेवला आहे. त्यासाठी भारतातर्फे १ कोटी डॉलर्सचा निधी देण्याचीही घोषणा केली आहे