विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधीताचा मृत्यू सोमवारी (दि. 30) झाला. संबंधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 22 मार्च रोजी उघडकीस आले होते. मृत्यू झालेली व्यक्ती मुळची ठाण्याची आहे.
कोरोनामुळे गेलेला पुण्यातील पहिला बळी 52 वर्षीय पुरूष असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप यंत्रणांना दिलेली नाही. ठाण्याहून पुण्याला आलेला हा रुग्ण होता. त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता, एरंडवण्यात सासऱ्याकडे ही व्यक्ती राहात होती, असे सूत्रांनी सांगितले. या व्यतिरीक्त पुण्यातील आणखी तीन कोरोनाग्रस्त अत्यावस्थ असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, आज मृत्यू झालेल्या कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या 34 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने चाचणीला पाठवण्यात आले होते. यातील काहींचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही होम क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत असून आतापर्यंत हा आकडा ४० वर पोचला आहे.