विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा शक्तिपरीक्षेआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, तरी काँग्रेसची खुमखुमी अजून जिरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे, १५ ऑगस्ट २०२० रोजी कमलनाथच मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण करतील. सध्याची विश्रांती अल्पकाळासाठी आहे. नेमक्या याच ट्विटवरून काँग्रेसची परंपरागत सत्तेची मस्ती दिसते.
त्यांचे उद्योग थांबलेले नाहीत, हेच या ट्विटवरून दिसते. मध्य प्रदेश काँग्रेस अशा दिवाळखोर नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे असे ट्विट सत्ता गेल्यानंतरही आले. कमलनाथ समर्थक मंत्र्याने त्याचे समर्थनही केले. त्यासाठी त्याने कमलनाथ – शिवराजसिंह चौहान यांच्या ताज्या भेटीचा हवालाही दिला. कमलनाथ यांनी राजीनामा दिला. पण जणू सत्ता गेलीच नाही, अशी ही वर्तणूक आहे.