• Download App
    ऑक्टोबरचे विनंती फोन आणि एप्रिलचा शरणागत फोन...!! | The Focus India

    ऑक्टोबरचे विनंती फोन आणि एप्रिलचा शरणागत फोन…!!

    विनय झोडगे

    • ७ लोककल्याण मार्गावरील सर्जनने operation केले तरी सिल्वर ओकच्या post operation treatment ची खात्री कोण देणार…??
    • २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात वर्षाचे फोन मातोश्रीने घेतले असते तर….. २०२० च्या एप्रिल अखेरीस ७ लोककल्याण मार्गावर फोन करण्याची वेळ आलीच नसती…!!
    • त्यावेळी वर्षावरून त्यावेळी येणारे फोन तडजोडीसाठीच होते. कदाचित….. तेथूनही मातोश्रीची वर्षावर पोहोचण्यासाठी तडजोड आणि तजवीज झाली असती पण मातोश्रीचा पगार खाऊन सिल्वर ओकच्या डॉक्टरांची “नोकरी” करणाऱ्या कंपाउंडरवर भरवसा ठेवला आणि सिल्वर ओकमधील anti midas touch शी संपर्क केला….. आणि आता वर्षावरील बस्तान टिकविण्यासाठी आमदारकीची बिदगी ७ लोककल्याण मार्गाकडे मागण्याची वेळ मातोश्रीवर आली आहे…!!
    • दिवस सहाच महिन्यांत “भरले” वाटतं…!! सिल्वर ओकचे डॉक्टर कोणाची natural delivery होऊच देत नाहीत. ते abortion नच करतात. त्यांनी abortion केल्यानंतर वर्षावरचे अपत्य पूर्ण वयापर्यंत कधीच वाढत नाही. ५० वर्षांची practice असलेल्या या डॉक्टरांची ख्यातीच तशी जबरदस्त आहे…!! भल्याभल्यांचे राजकीय abortion करण्यात सिल्वर ओकच्या डॉक्टरांचा हातखंडा आहे. सध्या मातोश्रीतून वर्षावर पोहोचविलेल्या पेशंटचे abortion सुरू आहे. पण पेशंट घाबरल्याने त्यानेच दिल्लीच्या ७ लोककल्याण मार्गावरील बड्या सर्जनला फोन लावल्याचे बोलले जात आहे…!! बघू या मोठे सर्जन काय निर्णय देतात ते…!!
    • मोठे सर्जन कदाचित operation सुरळित पार पाडतीलही…!! पण मूळातच तोळामासा असलेल्या पेशंटची तब्येत फारशी सुधारण्याची शक्यता नाही. कारण मोठ्या सर्जनने operation केले तरी post operation treatment सिल्वर ओकवरील डॉक्टर करणार असल्याने पेशंटच्या प्रकृतीविषयी कोणीच गँरंटी देऊ शकणार नाही, हे उघड आहे…!!

    Related posts

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: तळमळ! शिवसैनिक (कट्टर) संजय राऊत यांना काँग्रेसची चिंता – G 23 म्हणजे फक्त खाऊन ढेकर देणारे-राहुल गांधींची पाठराखण- तर ‘कश्मीर फाईल्स’म्हणजे ‘प्रपोगंडा’ ….