• Download App
    अमेरिकेत वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा २१३ शहरांमधील रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर्स, कोरोना टेस्ट कीट्स, मास्क नाहीत | The Focus India

    अमेरिकेत वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा २१३ शहरांमधील रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर्स, कोरोना टेस्ट कीट्स, मास्क नाहीत

    विशेष  प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस अमेरिकेतील मोठ्या आणि छोट्या शहरांमध्ये वेगाने पसरत असताना तेथे वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत असल्याचे पुढे येत आहे. कोरोना चाचणी कीट्स, व्हेंटिलेटर्स, मास्क व अन्य उपकरणांचा तुटवडा जाणवतो आहे, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने डॉक्टरांच्या हवाल्याने दिले आहे. कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर वाढून ती इटलीपेक्षा अधिक झाली आहे. तरी अद्याप ट्रम्प प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. इंडियानामधील एका वेअर हाऊसमध्ये लाखोंच्या संख्येने एक्सपायरी डेट उलटलेले एन ९५ मास्क आढळले.

    अमेरिकेतील महापौर परिषदेने २० ते २४ मार्च दरम्यान देशातील ४१ राज्यांमधील २१३ शहरांमध्ये सर्वे केला त्यात वैद्यकीय उपकरणांच्या तुटवड्याची वस्तुस्थिती उघड झाली. या शहरांची एकत्रित लोकसंख्या ४ कोटी २० लाख आहे. अमेरिकी सरकारने तातडीने पावले उचलून शहरांमध्ये हॉस्पिटल्समधील उपकरणांचा तुटवडा भरून काढला पाहिजे अन्यथा कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वेग परिणामकारकरित्या रोखता येणार नाही. शहरांमधील वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडतील, असा इशारा महापौर परिषदेने दिला आहे.

     

    कोरोनाच्या टेस्ट्साठी न्यूयॉर्क मध्ये उड़ालेली झुंबड

    Related posts

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: तळमळ! शिवसैनिक (कट्टर) संजय राऊत यांना काँग्रेसची चिंता – G 23 म्हणजे फक्त खाऊन ढेकर देणारे-राहुल गांधींची पाठराखण- तर ‘कश्मीर फाईल्स’म्हणजे ‘प्रपोगंडा’ ….