महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्यावर मी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय...
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.
विरोध असेल समर्थन असेल ते सगळं पूर्वी समोरासमोर असायचं.
मी मध्यंतरी विधानभवनात गेलो होतो, तेंव्हा कळतंच नव्हतं कोण कुठल्या पक्षाचा आहे.
भाषा ही तुमची ओळख असते, तुम्ही मराठी आहात म्हणजे तुम्ही मराठी बोलता म्हणून तुम्ही मराठी असता.