एसटीचा प्रवास कॅशलेस; काढता येणार डिजिटल तिकीट

 एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येईल अशा 5000 ॲण्ड्राईड तिकीट मशिन्स (android ticket machine) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत.

नव्या मशिनमुळे प्रवाशांना रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार आहे

रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार

रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे, डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न आहे.

नवीन ॲण्ड्राईड मशिन्स पहिल्या टप्प्यामध्ये अकोला, लातूर, यवतमाळ आदी शहरांमध्ये वापरात येणार आहेत.