विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!
स्वातंत्र्यदिना निमित्त पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे
भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याच्या रंगातील फुलांची आकर्षक सजावट केली गेली आहे
विठ्ठल-रखुमाईला देखील तिरंगा ध्वजाच्या रंगातील फुलांचा हार घातला गेला आहे.
संपूर्ण मंदिर परिसर तिरंगामय झाल्याने अधिकच उठून दिसत आहे.
स्वातंत्र्यदिना निमित्त मंदिराची ही विशेष सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.