देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी
टाटा मोटर्सने आज त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक टाटा टियागो (Tata Tiago) चे EV व्हेरियंट लाँच केले.
2025 पर्यंत, टाटा मोटर्सकडे 10 नवीन BEV वाहने असतील. टाटा समूह चार्जिंग पायाभूत सुविधांच्या उभारणीत गुंतवणूक करेल
टियागोमध्ये 8 स्पीकर सिस्टम, रेन सेन्सिंग वायपर, क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ORVM आणि बरेच काही फीचर्स
सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ईव्हीला एका चार्जमध्ये 315 किमीची रेंज मिळेल.
Tiago EV ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या EV वर 1,60,000 किमी पर्यंत बॅटरी आणि मोटर वॉरंटी उपलब्ध असेल.