है तैयार हम ….! पाकिस्तानला योग्य वेळी,योग्य ठिकाणी आणि योग्य उत्तर देणार


लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे : देशाला भेडसावणार्या प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे

 

भारत देशावर येणार्या प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी भारतीय सेना सदैव तत्पर आहे .पाकिस्तान सतत राजकारण म्हणून दहशतवादाचा वापर करत आहे, आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही दहशतवाद खपवून घेणार नाही. सीमापार दहशतवादाला वेळेवर उत्तर देण्याचा आमचा अधिकार आहे. Will give Pakistan the right time, the right place and the right answer  

पाकिस्तान आणि चीन एकत्रितपणे एक खुप मोठा धोका आहे आणि त्यांच्या एकत्रित येण्याच्या शक्यता नकारता येणार नाही. परंतु देशाला भेडसावणार्या प्रत्येक धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. अशी चेतावणी आर्मी चीफ जनरल एमएम नरवणे यांनी सैन्य दिनी पाकिस्तानला दिली आहे.


पाकिस्तान आणि चीन एकत्र एक शक्तिशाली धोका निर्माण करतात

सैन्य प्रमुख म्हणाले, पाकिस्तान आणि चीन एकत्र एक शक्तिशाली धोका निर्माण करतात आणि एकत्र येण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही. पूर्व लडाखमधील सध्या सुरू असलेल्या तणावावर सैन्य प्रमुख म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत, आमच्या सैन्याची तयारी खूपच जास्त आहे.

सैन्याचा सक्षमतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर

जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले, “भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम सैन्याची निर्मिती करण्यासाठी सर्व नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी सर्वसमावेशक रोडमॅप तयार केला आहे .
तसेच लष्करी बिगर लष्करी भागात चीन आणि पाकिस्तान हे एकमेकांना सहकार्य वाढ करत आहेत. ह्या दोन धोक्यांचा
सामना करण्यासाठी आपल्याला नेहमीच सज्ज रहावे लागेल.

Will give Pakistan the right time, the right place and the right answer


भारत आणि चीन यांच्यातील चर्चेचा उपयोग परस्पर आणि समान सुरक्षेच्या जोरावर समस्या सोडवण्यासाठी केला जाईल. मला खात्री आहे की आम्ही हा प्रश्न सोडवू.

आम्हाला सरकारने सुचना दिल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तय्यार रहावे लागेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती