ममता बॅनर्जींच्या सून कोळसा घोटाळ्यातील आरोपी रुजिरा बॅनर्जींना दुबईला जाताना कोलकत्ता विमानतळावरच रोखले!!


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुनबाई आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा नरुला बॅनर्जी यांना दुबईला जाताना पोलिसांनी नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय कोलकत्ता विमानतळावरच रोखले. Mamata Banerjee’s daughter-in-law Coal scam accused Rujira Banerjee stopped at Kolkata airport on her way to Dubai

कोट्यवधी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात रुजिरा बॅनर्जी या आरोपी आहेत आणि त्यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने 8 जून रोजी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. मात्र ही नोटीस टाळून रुजिरा बॅनर्जी दुबईला जात होत्या. त्यामुळे त्यांना लुक आउट नोटीस या कायदेशीर कारवाई खाली कोलकाता विमानतळावरच पोलिसांनी रोखले. आता त्यांना 8 जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

कोळसा घोटाळा केस थेट ममता बॅनर्जी यांच्या घरापर्यंत पोहोचली असून त्यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्याची ईडी चौकशी थांबवण्याचे प्रयत्न केले. परंतु सुप्रीम कोर्टाने ही चौकशी आणि तपास थांबवायला नकार दिला. त्यामुळे ईडीने आता कोळसा घोटाळ्यातील चौकशी आणि तपास वेगवान केला असून एकापाठोपाठ एक आरोपींना नोटीसा धाडल्या आहेत.

त्यापैकी एक नोटीस रुजिरा बॅनर्जी यांना पाठवली असून त्यांना 8 जून 2023 रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. परंतु ही नोटीस टाळून रुजिरा बॅनर्जी दुबईला जात होत्या म्हणून पोलिसांनी लुक आऊट नोटीसच्या आधारे कोलकत्ता विमानतळावर रोखले आणि घरी पाठवून दिले.

Mamata Banerjee’s daughter-in-law Coal scam accused Rujira Banerjee stopped at Kolkata airport on her way to Dubai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात