नेपाळी संघटनांना भारताविरुध्द उचकविण्यासाठी चीन पुरवतेय पैसे


भारताविरुध्द नेपाळमधील राजकारण्यांना चीन फूस देत असल्याचे उघड झाले आहेच. पण नेपाळमधील संघटनांना भारताविरोधात आंदोलन करण्यासाठी चीनकडून पैसे पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण असल्याचे दाखविण्यासाठी चीनचा हा डाव आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताविरुध्द नेपाळमधील राजकारण्यांना चीन फूस देत असल्याचे उघड झाले आहेच. पण नेपाळमधील संघटनांना भारताविरोधात आंदोलन करण्यासाठी चीनकडून पैसे पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण असल्याचे दाखविण्यासाठी चीनचा हा डाव आहे.

भारतीय गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने भारताच्या सीमेवर असलेल्या भागांमध्ये काम करणाऱ्या अनेक संघटनांना भारताविरुद्ध उचकवले आहे. या संघटनांना भारत-चीन सीमा वादाविरोधात प्रदर्शन करण्यास सांगितले जात आहे. यासाठी चीनी दूतावासाने नेपाळी संघटनांना अडीच कोटी रुपये दिले आहेत.

भारतने लिपुलेखपासून धारचूलापर्यंत रस्ता बनवला आहे. यानंतर नेपाळने नवीन नकाशा जारी करुन भारताचे तीन भाग नेपाळमध्ये असल्याचे दाखवले. यात लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुराला नेपाळमध्ये असल्याचे दाखवले आहे. दोन्ही देशांमध्ये या तीन भागांवरुन वाद सुरू आहे.

चीनने गोरखा तरुणांवर स्टडी करण्यासाठी काठमांडूच्या एका एनजीओला 12.7 लाख नेपाळी रुपये दिले आहेत. चीन हे माहित करुन घेत आहे की, गोरखा समाजातील तरुण भारतीय सैन्यात भरती का होत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेपाळमध्ये चीनच्या राजदूत होऊ यानकीने नेपाळी एनजीओ चाइना स्टडी सेंटर (सीएससी) ला फंड दिला होता.

चीन म्यानमारच्या बंडखोरांनाही हत्यार देऊन भारताविरोधात भडकवत आहे. यातून चीनला पूर्वोत्तरच्या राज्यांमध्ये अशांती पसरवयची आहे. नेदरलँडच्या अँमस्टरडॅम आधारित थिंक टँक युरोपियन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (ईएफएसएएस) ने मागच्या महिन्यात जारी आपल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला होता. त्यात म्हटले की, जुलैमध्ये म्यानमारमध्ये थायलँडच्या सीमेवरील मेइ ताओ भागात चीनी हत्यारांचा एक मोठा साठा जप्त करण्यात आला. ही हत्यारे बंडखोर संघटनांना पाठवली होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था