आघाडीबद्दल कॉंग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडं आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आघाडीबद्दल काँग्रेसच्या मंत्र्यांचे काय मत आहे याकडं आम्ही लक्ष देणार नाही. ज्या पक्षाला स्वत:चा अध्यक्ष ठरवता येत नाही, तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे.
विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मंगळवारी ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणााले, या सगळ्याकडं आता आम्ही फार लक्ष देत नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद सुरू आहेत. सोनिया गांधींना अध्यक्षपदी राहायचं नाहीए. पण त्यांनाच राहावं लागतंय. जे अध्यक्ष पदाविषयी ठरवू शकत नाहीत, ते पुढचं काय ठरवणार? इतक्या मोठ्या पक्षाची ही अवस्था का झाली याचं आत्मचिंतन त्यांनी करायला हवं.
काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्यावरही अद्याप पक्षातील वाद शमलेला नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवर फडणवीस यांनी टीका केली.