आई-मुलाचा चीनबरोबरचा सामंजस्य करार, ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानंतर भाजपाचा सोनिया-राहुल गांधींवर निशाणा

आई आणि मुलानं २००८ मध्येच चीनसोबत एक सामंजस्य करार केला होता, हे आम्ही आधीच बोललो होतो. त्यांनी आपला स्वाभिमान तारण म्हणून ठेवला होता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी केली आहे. कॉंग्रेस मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चीनी ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानंतर संबित पात्रा यांनी गांधींवर निशाणा साधला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आई आणि मुलानं २००८ मध्येच चीनसोबत एक सामंजस्य करार केला होता हे आम्ही आधीच बोललो होतो. त्यांनी आपला स्वाभिमान तारण म्हणून ठेवला होता, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी केली आहे. कॉंग्रेस मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चीनी ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानंतर संबित पात्रा यांनी कॉंगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भाजप सरकारला मोठा धक्का देण्याची वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चीनसोबत सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे मोठ्या दबावाखाली आहे. काँग्रेस पक्षही भाजपाच्या सत्तेला मोठा धक्का देण्याची संधी शोधत आहे. हेच कारण आहे की ते भाजपाचं प्रशासन आणि परराष्ट्र धोरणांवर सतत हल्ला करत आहेत.

कॉंग्रेसवर ग्लोबल टाईम्सने दाखविलेल्या विश्वासानंतर भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठविली आहे. संबित पात्रा याबाबत म्हणाले की, आज चीन आणि काँग्रेस मोदी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्लोबल टाईम्सही काँग्रेसच्या समर्थनार्थ उतरला आहे.


यापूर्वी चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच निरनिराळ्या स्तरावर झालेल्या चर्चांमधून काय साध्य झालं असा सवालही काँग्रेसनं केला होता. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी देशवासीयांना विश्वासात घ्यावं. चीन आपल्या जमिनीवरून आपला ताबा कधी सोडणार हे त्यांनी सांगावं. चीनच्या डोळ्यात डोळे घालून चर्चा केव्हा होणार?असा सवाल काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*