शिवसेनेची खुन्नस; कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती; महापालिकेकडे मागितले उत्तर


  • कंगना मुंबईत; शिवसैनिक – रिपई सैनिक भिडले

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : शिवसेनेने खुन्नस दिली तरी कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या. त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं.

मुंबई विमानतळावर रिपाइं सैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने

कंगना रणौत थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल झली. तिच्या समर्थनार्थ रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेली रिपाइं आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम तोडण्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने देण्यात आली स्थगिती. याप्रकरणी उद्या तीन वाजता सुनावणी होणार आहे.

Bombay High Court stays BMC’s demolition at Kangana Ranaut’s property, asks the civic body to file reply on actor’s petition pic.twitter.com/VaoeBSOnay— ANI (@ANI) September 9, 2020
13:40 (IST)09 SEP 2020

‘सबका टाइम आयेगा’, कंगना रणौतच्या कार्यालयावरील कारवाईनंतर नितेश राणेंचे सूचक टि्वट केले. कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळया प्रतिक्रिया येत आहेत. कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली.

कंगनाच्या वकिलांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी

कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या रक्षणासाठी आज मुंबई विमानतळावर टर्मिनल 2 वर पी 4 पार्किंग येथे रिपाइं कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केल्यानुसार कंगना रणौतच्या संरक्षणासाठी दुपारी 12.30 वाजता रिपाइं कार्यकर्ते विमानतळावर हजर राहणार आहेत. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विवेक पवार यांनी ही माहिती दिली आहे.

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली

कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर सुरु असलेली कारवाई थांबवण्यात आली आहे. कारवाईसाठी आणलेलं सर्व साहित्य घेऊन महापालिका कर्मचारी पुन्हा परतले आहेत. कंगनाच्या वकिलांनी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली असून दुपारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होईपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

12:47 (IST)09 SEP 2020

माझ्या घऱात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही – कंगना

कंगनाने ट्विट करत आपल्या घऱात कोणतंही अनधिकृत बांधकाम नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने लिहिलं आहे की, “माझ्या घरात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही. तसंच सरकारने ३० सप्टेंबपर्यंत सर्व प्रकारच्या तोडक कारवाईवर बंदी आणली आहे. बॉलिवूडकरांनो फॅसिझम असं असतं”.

12:18 (IST)09 SEP 2020

“टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, ऑफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन गेली होती का?”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई कऱण्यात येणार आहे. यावरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत एकामागोमाग प्रश्न विचारले आहे. बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहिले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.

कंगनाकडून पुन्हा एकदा मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणून उल्लेख

मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्याने आधीच वाद निर्माण झालेल असताना कंगनाने पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला आहे. कंगनाने पालिकेच्या कारवाईवर टीका करणारं ट्विट करत लिहिलं आहे की, मी कधीच चुकीची नसते हे माझे विरोधक वारंवार सिद्द करत असतात. याच कारणाने माझी मुंबई आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर झालं आहे.

I am never wrong and my enemies prove again and again this is why my Mumbai is POK now deathofdemocracy pic.twitter.com/bWHyEtz7Qy

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

11:31 (IST)09 SEP 2020

“लोकशाहीचा मृत्यू,” महापालिका कारवाईचे फोटो ट्विट करत कंगनाची टीका

मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत. कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे.

Pakistan…. deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

11:21 (IST)09 SEP 2020

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर कारवाईला सुरुवात, अनधिकृत बांधकामावर हातोडा

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

11:07 (IST)09 SEP 2020

कंगनाच्या कार्यालयावर कारवाईसाठी मनपा कर्मचारी दाखल

कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”.

मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम

pic.twitter.com/KvY9T0Nkvi

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

11:03 (IST)09 SEP 2020

कंगना चंदीगढ विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात मुंबईसाठी रवाना

कंगना रणौत चंदीगढला विमानतळावर दाखल झाली असून थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत.

10:51 (IST)09 SEP 2020

कंगनाने मुंबईत येण्याआधी मंदिरात घेतलं दर्शन

WATCH Himachal Pradesh: Actor Kangana Ranaut offered prayers at a temple in Kothi area of Hamirpur district earlier today. She is en route Chandigarh from Mandi District. From Chandigarh, she will be leaving for Mumbai. pic.twitter.com/Yvls0VA4To

— ANI (@ANI) September 9, 2020

10:47 (IST)09 SEP 2020

…तर कायमची मुंबई सोडून देईन, कंगनाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. तसंच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु असंही ती म्हणाली आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय”.संपूर्ण बातमी वाचण्यासाठी

10:33 (IST)09 SEP 2020

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी रक्त देण्यासाठीही तयार – कंगना

“मुंबई दर्शन घेण्यासाठी मी विमानतळाच्या दिशेने प्रवास करत आहे. यावेळी महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या संपत्तीजवळ बेकायेदशीरपणे कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी रक्त देण्यासाठीही तयार आहे, हे काहीच नाही. सर्व घेऊ शकता पण माझं उत्साह वाढत राहील,” असं कंगनाने ट्विट करत म्हटलं आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता असून त्यानिमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचा फोटो ट्विट करत कंगनाने टीका केली आहे.

As I am all set for Mumbai Darshan on my way to the airport,Maha government and their goons are at my property all set to illegally break it down, go on! I promised to give blood for Maharashtra pride this is nothing take everything but my spirit will only rise higher and higher. pic.twitter.com/6lE9LoKGjq

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

09:49 (IST)09 SEP 2020

अनिल देशमुख यांना धमकीचा फोन

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी देणारा फोन करण्यात आला. कंगनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकी देणारा फोन आल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

A threat call was received yesterday at Nagpur office of Maharashtra Home Minister Anil Deshmukh, following his statement on actor Kangana Ranaut: Official at State Home Minister’s office. Maharashtra

— ANI (@ANI) September 9, 2020

09:39 (IST)09 SEP 2020

करणी सेनेचा कंगनाला पाठिंबा

कंगना रणौतला करणी सेनेने पाठिंबा दर्शवलेला आहे. मुंबई विमानतळापासून ते तिच्या घरापर्यंत सुरक्षित नेण्यासाठी आपण तिला संरक्षण देऊ असं करणी सेनेने जाहीर केलं आहे.

मी पण महाराष्ट्राला एक अशी मुलगी दिली आहे…

कंगनाने मुंबईला येण्यासाठी प्रवास सुरु केला असून चंदीगढच्या दिशेने रवाना झाली आहे. चंदीगढ येथून कंगना विमानाने मुंबईसाठी प्रवास सुरु करणार आहे. यादरम्यान कंगनाने अजून एक ट्विट केलं असून मुंबई आपलं घर असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्राने आपल्याला सर्व काही दिलं आहे हे मान्य आहे, पण आपणही महाराष्ट्राला अशी एक मुलगी दिली आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर महिलांच्या सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्त देऊ शकते असं म्हटलं आहे.

ये मुंबई में मेरा घर है,मैं मानती हूँ महाराष्ट्रा ने मुझे सब कुछ दिया है, मगर मैंने भी महाराष्ट्रा को अपनी भक्ति और प्रेम से एक ऐसी बेटी की भेंट दी है जो महाराष्ट्रा शिवाजी महाराज की जन्मभूमि में स्त्री सम्मान और अस्मिता केलिए अपना ख़ून भी दे सकती है, जय महाराष्ट्रा pic.twitter.com/BfBtaQ2CR0

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

08:44 (IST)09 SEP 2020

कंगनाला RPI संरक्षण देईल– रामदास आठवले

कंगना आज मुंबई विमातळावर दाखल होणार असून यावेळी आरपीआय तिला संरक्षण देईल अशी घोषणा रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे. ४ सप्टेंबरला रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल”.

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल@KanganaTeam@CMOMaharashtra @rautsanjay61

— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 4, 2020

08:06 (IST)09 SEP 2020

मुंबईत येण्यापूर्वी कंगनाचं ट्विट

कंगना रणौत आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याआधी तिने ट्विट केलं असून ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे. आपल्याला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी

— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

07:54 (IST)09 SEP 2020

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई बीएमसीने तूर्तास थांबवली आहे. मुंबई उच्च न्ययलयने चपरक हणून कारवाईस स्थगिती देतच तोडकामासाठी आलेले कर्मचारी आणि जेसीबी रवाना झाले आहेत.

अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील कारवाई बीएमसीने तूर्तास थांबवली आहे. तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेल महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे. या तोडकामाविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडक काम तूर्तास थांबवलं आहे.

कार्यालयातील तळमजल्यावर तोडकाम केलं. तसंच कार्यालयाची संरक्षक भिंत तसंच कंपाऊंडवर जेसीबी चालवण्यात आला. यानंतर कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी तिथे पोहोचले. त्यानंतर ही कारवाई काही काळ थांबवण्यात आली.

आधी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना, आता पाकिस्तान असा उल्लेख; कंगनाकडून ट्वीटची मालिका सुरुच ठेवली.
महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाच्या पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी.

कोणतंही अनधिकृत बांधकाम नाह

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*