दोन हात वर करून बाळासाहेब काय म्हणत असतील… उध्दवा, तुझा निर्णय चुकलाच!!; आठवलेंनी बोलून दाखविले “पुतळ्याचे मनोगत”प्रतिनिधी

पुणे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनाप्रमुखांचे मनोगतच आज बोलून दाखविले… “उद्धव ठाकरेंनी काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता मिळविली पण, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र असण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवले.your decision is wrong ramdas Athavale speaks of the mind of the balasaheb statue

काल मी बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो. तेव्हा पुतळा पाहून एकच वाटले की, बाळासाहेब दोन्ही हात वर करून एकच म्हणत असतील, उद्धवा काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत जाण्याचा तुझा निर्णय चुकलाच.”वरील विधान करून आठवले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत खसखस पिकवली. पण त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधून घेतला. आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद घ्यायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. त्यांना कालच्या कार्यक्रमात मी मनातून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछा दिल्यात.

अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेस कधीही महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होते, ते साकारण्यासाठी एकत्र यावे. यासाठी मी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे आणि उर्वरित तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना द्यावे. मला आजही वाटते भविष्यात आम्ही एकत्र येऊ.”

your decision is wrong ramdas Athavale speaks of the mind of the balasaheb statue

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था