भारतीय गणितज्ञाचा अमेरिकेत गौरव, युवा गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना ‘मायकेल अँड शीला हेल्ड’ पुरस्कार जाहीर

Young Indian mathematician Nikhil Srivastava honored with 'Michael and Sheila Held' award

‘मायकेल आणि शीला हेल्ड प्राइज’ पुरस्कारात पदक तसेच दहा लाख अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. श्रीवास्तव, मार्कस आणि स्पीलमॅन या तिघांनी कॅडिसन-सिंगर समस्येशी संबंधित प्रश्न आणि रामानुजन ग्राफशी संबंधित प्रश्न दीर्घकाळापासून सोडवत आले आहेत. Young Indian mathematician Nikhil Srivastava honored with ‘Michael and Sheila Held’ award


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : तरुण भारतीय गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांना ‘मायकेल अँड शीला हेल्ड’ पुरस्काराचे संयुक्त विजेता घोषित करण्यात आले आहे. दीर्घकाळापासून कॅडिसन-सिंगर समस्या आणि रामानुजन ग्राफवरील प्रश्न सोडवण्याबद्दल निखिल श्रीवास्तव यांच्यासह आणखी दोन जणांना ‘मायकेल अँड शीला हेल्ड’ पुरस्काराचे विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅलिफोर्निया विद्यापीठाचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसाने (ईपीएफएल) चे अ‍ॅडम मार्कस आणि येल युनिव्हर्सिटीचे डॅनियल स्पीलमॅन यांना 2021चा ‘मायकेल अँड शीला हेल्ड अवॉर्ड’ देण्यात येत आहे.

Young Indian mathematician Nikhil Srivastava honored with ‘Michael and Sheila Held’ award

‘मायकेल अँड शीला हेल्ड प्राइज’मध्ये बक्षीस म्हणून पदक तसेच दहा लाख अमेरिकन डॉलर्सचा समावेश आहे. श्रीवास्तव, मार्कस आणि स्पीलमॅन हे तिघेही कॅडिसन-सिंगर समस्येशी संबंधित प्रश्न आणि रामानुजन ग्राफसंबंधित प्रश्न दीर्घकाळापासून सोडवत आहेत. या प्रक्रियेमध्ये रेखीय बीजगणित, बहुपदी भूमिती आणि आलेख सिद्धांत यांच्यातील एक नवीन संबंध शोधला जातो. श्रीवास्तव सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणिताचे सहयोगी प्राध्यापक आहेत.

Young Indian mathematician Nikhil Srivastava honored with 'Michael and Sheila Held' award

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती