Yogi Governments Achievement Uttar Pradesh becomes second largest contributor to GSDP

महामारी- मंदीच्या काळातही योगी सरकारची देदीप्यमान कामगिरी; GSDPमध्ये तमिळनाडू, गुजरात, कर्नाटकला मागे टाकून यूपी बनले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशने सकल राज्य घरगुती उत्पादनात (GSDP) दुसरे सर्वात मोठे राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. तब्बल 19.48 लाख कोटी रुपयांच्या जीएसडीपीची नोंद उत्तर प्रदेशने केली आहे. या प्रक्रियेत यूपीने गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूला मागे टाकले आहे. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात ही आर्थिक पुनरुज्जीवनाची कामगिरी यूपीमध्ये झाली आहे. Yogi Governments Achievement Uttar Pradesh becomes second largest contributor to GSDP


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशने सकल राज्य घरगुती उत्पादनात (GSDP) दुसरे सर्वात मोठे राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. तब्बल 19.48 लाख कोटी रुपयांच्या जीएसडीपीची नोंद उत्तर प्रदेशने केली आहे. या प्रक्रियेत यूपीने गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूला मागे टाकले आहे. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या काळात ही आर्थिक पुनरुज्जीवनाची कामगिरी यूपीमध्ये झाली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या काळातही उत्तर प्रदेशने ग्रोस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट (जीएसडीपी) मध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय पातळीवर दीर्घ काळ प्रभाव टाकल्यामुळे हे राज्य चर्चेत राहिले आहे. व्यवसाय करण्याच्या सोयीमुळे दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. किसान सन्मान निधी वितरणात उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेश घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले की, किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 2.37 कोटी शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल राज्य सरकारला केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र मिळाले आहे.”राज्याच्या वित्त विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020-2021 मध्ये उत्तर प्रदेशची जीएसडीपी 268 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील मुंबईनंतर उत्तर प्रदेशने हे दुसर्‍या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

2019-2020 मध्ये यूपी पाचव्या स्थानावर होते आणि 2020-2021 मध्ये तमिळनाडूची जागा पटकावून राज्याने तीन स्थानांनी झेप घेतली आहे. गत आर्थिक वर्षात दुसर्‍या क्रमांकावर असलेले तामिळनाडूने 19.2 लाख कोटी रुपयांसह आता तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. कर्नाटक चौथ्या क्रमांकावर (18.03 लाख कोटी रुपये) आणि गुजरात (17.4 लाख कोटी रुपयांसह) पाचव्या स्थानावर आहे.

Yogi Governments Achievement Uttar Pradesh becomes second largest contributor to GSDP

याच वृत्तानुसार, फेब्रुवारी 2018 मध्ये गुंतवणूकदारांच्या परिषदेदरम्यान झालेल्या 4.28 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांपैकी तब्बल 3 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरूदेखील झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागच्या दोन वर्षांत राज्याची निर्यातही 32 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*