योगी सरकार गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ, चार वर्षांत एन्काऊंटरमध्ये १३५ गुन्हेगारांचा खात्मा, ९३३ कोटी रुपयांची अवैध संपत्ती जप्त


उत्तर प्रदेश पोलीसांच्या बंदुकीतून गोळ्या आहेत की नाही असे एके काळी म्हटले जायचे. परंतु, पोलीसांना बळ दिल्याने उत्तर प्रदेशासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ बनले आहे. योगींच्या चार वर्षांच्या काळात १३५ गुन्हेगारांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती चांगली झाली आहे.Yogi government cracks down on criminals, eliminates 135 criminals in encounter in four years, seizes illegal assets worth Rs 933 crore


विशेष प्रतिनिधी 

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलीसांच्या बंदुकीतून गोळ्या आहेत की नाही असे एके काळी म्हटले जायचे. परंतु, पोलीसांना बळ दिल्याने उत्तर प्रदेशासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ बनले आहे.

योगींच्या चार वर्षांच्या काळात १३५ गुन्हेगारांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती चांगली झाली आहे.योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गुन्हेगारांमध्ये कोणताही आपपरभाव केला नाही. सामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करताना गुन्हेगारांना शासन करण्याची भूमिका ठेवली.गेल्या चार वर्षांत योगी आदित्यनाथ सरकारने दिलेल्या बळामुळे उत्तर प्रदेश पोलीस अपराध्यांवर कहर बनून तुटून पडली आहे. पूर्वांचल भागात दहशतीचा पर्याय मानला जाणारा मुख्तार अन्सारी, अतिक अहमदसारखे मोठे गुन्हेगार स्वत: दहशतीत आहेत. आजपर्यंत राजकीय आश्रय मिळाल्याने उन्मत्त झालेला मुख्तार अन्सारी इतका घाबरला आहे की उत्तर प्रदेशात येण्यास तयार नाही. पंजाबमध्ये लपून बसला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतल्यानंतर लगेच गुन्हेगारांना इशारा दिला होता. एक तर गुन्हेगारी सोडा किंवा उत्तर प्रदेश सोडून जा असे त्यांनी म्हटले होते. ज्याला ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असेही ते म्हणाले होते.

त्यामुळे योगींनी अपराध्यांना शासन करण्यासाठी ऑपेरेशन क्लिन नावाची मोहीम सुरू केली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलीसांबाबत जरब निर्माण झाली आहे. अनेक घटनांमध्ये तर कारवाईच्या भीतीने गुन्हेगारांनी स्वत:हून पोलीसांकडे आत्मसमर्पण केले. आपल्या अवैध मालमत्ता आणि बांधकामे पाडून टाकली.

केवळ मुख्तार अन्सारी किंवा अतीक अहमदच नव्हे तर राज्यातील २५ बड्या माफियांवर पोलीसांनी लक्ष केंद्रीत केले होते. या माफिया गॅँगच्या विरोधत कारवाई सुरू केली.त्यांच्या सहकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. कोणत्याही गुन्हेगाराची ताकद म्हणजे त्याचे काळे साम्राज्य.

उत्तर प्रदेशात काळ्या पैशातून गुन्हेगारांनी अवैधरित्या अनेक इमारती उभ्या होत्या. योगी आदित्यनाथ यांनी या इमारतींवर बुलडोझर चालविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे ही कारवाई करण्यासाठी लागणारा खर्च याच गुन्हेगारांकडून वसूल करण्यात आला.

त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आत्तापर्यंत २५ हून अधिक माफियांकडून ९३३ कोटी रुपयांची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सरकारी जमीनींवर त्यांनी केलेली अतिक्रमणेही हटविण्यात आली. यामध्ये माफियांनी ४४६ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर माफिया गॅँगकडून १५० पेक्षा जास्त शस्त्र परवानेही जप्त करण्यात आले आहेत. माफियांवर ११,९३० गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. ३६९९ गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

पोलीसांनी गुन्हेगारीचा समूळ नाश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. जे गुन्हेगार शरण आले नाहीत त्यांचा एन्काऊंटर झाला. गेल्या चार वर्षांत १३५ गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला. यामध्ये २८०० जण जखमी झशले. आत्तापर्यंत २५ हजार रुपयांचे इनाम असलेलले ९१५७, २५ ते ५० हजारांपर्यंत इनाम असलेले ७७३ आणि ५० हजारांपेक्षा जास्त इनाम असलेले ९१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

पोलीसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. २०१७ च्या तुलनेत २०२० मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यात ६५.७२ टक्के, लुटमारीच्या घटनांत ६६.१५ टक्के,

खुनाच्या घटनांत १९.८० टक्के, अपहरणाच्या घटनांत ४०.२० टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये ४५.४३ टक्के घट झाली आहे.

Yogi government cracks down on criminals, eliminates 135 criminals in encounter in four years, seizes illegal assets worth Rs 933 crore

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था