योगी आदित्यनाथांच्या कोरोनाकाळातील कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, टाईम मॅगझिनने केले कामाचे कौतुक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजत आहे. विक्रमी संख्येने घेतलेल्या कोरोना चाचण्या, स्थलांतरीत मजुरांना रोजगार आणि लघु- मध्यम उद्योगांना दिलेले पाठबळ याची दखल प्रतिष्ठित टाईम मॅगझिनने घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी संकटाच्या प्रसंगी कुशल व्यवस्थापनाचे उदाहरण घालून दिले असेही म्हटले आहे. Yogi Adityanath’s work in the Corona period was hailed internationally by Time Magazine


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजत आहे. विक्रमी संख्येने घेतलेल्या कोरोना चाचण्या, स्थलांतरीत मजुरांना रोजगार आणि लघु- मध्यम उद्योगांना दिलेले पाठबळ याची दखल प्रतिष्ठित टाईम मॅगझिनने घेतली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी संकटाच्या प्रसंगी कुशल व्यवस्थापनाचे उदाहरण घालून दिले असेही म्हटले आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने कोरोनावर उपाययोजनेसाठी उचललेल्या पावलांमुळे संपूर्ण जग प्रभावित झाल्याचे टाईम मॅगझिननने म्हटले आहे. प्रामुख्याने कोरोनाच्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसींगसाठी उत्तर प्रदेशात झालेले काम विशेष उल्लेखनिय असल्याचे म्हटले आहे.उत्तर प्रदेशात ७० हजार आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत होते. त्यांनी कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क लोकांचे कॉंटक्ट ट्रेसींग केले. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्याचा विक्रम करण्यात आला. दिवसाला तब्बल पावणेदोन लाख चाचण्या केल्या जात आहेत. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हपाासूनच उत्तर प्रदेशातील सर्व शासकीय यंत्रणेला योगी आदित्यनाथ यांनी सक्रीय केले. त्यावर उपाययोजनेसाठी तातडीने पावले उचलली. आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबुत करण्यास सुरूवात केली. कोरोना फ्लो चार्ट, सतर्कता आणि नागरिकांना जागरुक करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम बनवली. त्यांच्याकडून कोरोना विरुध्द केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर लक्ष ठेवले जात होते. या अधिकाऱ्यांना वेगवेगळी कामे वाटून देण्यत आली होती. त्याचेच नंतर इतर राज्यांनीही अनुकरण केले. सर्वात प्रथम उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, यावेळी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. प्रत्येकाची काळजी घेतली गेली.

कोरोना रोखण्यासाठी चाचणी करणे हाच एक पर्याय होता. उत्तर प्रदेश सरकारने मिशन मोडवर यासाठी काम केले. उत्तर प्रदेशात केवळ एक चाचणी प्रयोगशाळा होती. २२ मार्च रोजी केवळ ६० चाचण्या त्याठिकाणी होऊ शकत होत्या. परंतु, संपूर्ण शासकीय यंत्रणेला कार्यान्वित करून युध्दपातळीवर प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. सध्या उत्तर प्रदेशात २३४ चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यातील १३० शासकीय आहेत. त्यामुळेच राज्यात आत्तापर्यंत अडीच कोटी चाचण्या होऊ शकल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात इंटीग्रेटेड कंट्रोल अ‍ॅँड कमांड सेंटर उभारण्यता आले. टेस्टींग, कॉन्टॅक्ट ट्रेसींग, होम आयसोलेशनची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणांचा खूप उपयोग झाला.देशाच्या सर्व भागांतून परत येत असलेले स्थलांतरीत मजूर हे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे आव्हान होते. या मजुरांची व्यवस्था हा योगी आदित्यनाथ सरकारचा मास्टरस्ट्रोक होता. या काळात तब्बल ४० लाख स्थलांतरीत मजूर राज्यात आले. त्यांच्यासाठी १६६० रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करणे हे आव्हानात्मक काम होते. मजुरांना स्वच्छ भोजन आणि पाणी मिळावे यासाठी कम्युनिटी किचन्सची व्यवस्था करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळात पावणेसात कोटी भोजनाची पाकिटे वाटण्यात आली. विविध प्रकारच्या पेन्शन योजनांच्या माध्यमातून ८६ लाखांवर लोकांना दोन महिन्यांची पेन्शन अ‍ॅडव्हान्स देण्यात आली. त्याचबरोबर गोरगरीबांना एप्रिल महिन्यापासूनच अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. विविध राज्यांतून आलेल्या मजुरांना रोजगार देण्यासाठी ४० लाख मजुरांचे स्किल मॅपींग करण्यात आले. त्यांना रोजगार देण्यासाठी ८ लाख लघुउद्योग सुरू करण्यात आले. त्याचबरोबर लेबर कमीशनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून ५१ लाख मजुरांना रोजगार देण्यात आला. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत ४.३५ लाख उद्योगांना १०,७४४ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात ५.८१ लाख नवीन लघुउद्योग उभारण्यात आले.
उत्तर प्रदेशात कोरोनामुळे मृत्यूचा दर केवळ १.३ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के आहे.

Yogi Adityanath’s work in the Corona period was hailed internationally by Time Magazine

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनीही योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना म्हटले होते की उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळेच किमान ८५ हजार जणांचे प्राण वाचले. हेच संकट २०१७ पूर्वी आले असते तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*