ट्विटर इंडियावर योगीजी नंबर वन, उत्तर प्रदेशाची प्रतिमाच बदलून टाकल्याने कौतुक


पंतप्रधान आावास योजनेत देशात प्रथम क्रमांक आणि मिर्झापूर नगरपालिकेला देशातील सर्वोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विटरवर योगीजी नंबर वनचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जलवा सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान आावास योजनेत देशात प्रथम क्रमांक आणि मिर्झापूर नगरपालिकेला देशातील सर्वोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विटरवर योगीजी नंबर वनचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जलवा सुरू आहे. Yogi Adityanath Trending Number One on Twitter India for changing the image of Uttar Pradeshपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात नव्या तंत्रज्ञानावर आधारित लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन करताना पंतप्रधान आवास योजनेत उत्तर प्रदेशने प्रथम क्रमांक मिळविल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ट्विटरवर योगीजीनंबरवन हा हॅश टॅग ट्रेंड करू लागला. योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा देण्यासाठी ४५ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचे कौतुक सुरू झाले.


एकेकाळी बिमारू आणि मागास राज्य म्हणून ओळख असलेला उत्तर प्रदेश आता विकासाच्या क्षितीजावर चमकू लागला आहे. योगींनी सामान्य माणसाच्या विचाराला विकास, विश्वास आणि सुशासनात बदलले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक क्षेत्रांत उत्तर प्रदेशाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

Yogi Adityanath Trending Number One on Twitter India for changing the image of Uttar Pradesh

उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील गरजू कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या कुटुंबांसाठी घराचे स्वप्नच होते ते आता पक्क्या घरात राहत आहेत. २०१६ मध्ये उत्तर प्रदेश पंतप्रधान आवास योजनेत २६ व्या क्रमांकावर होते. चार वर्षांत उत्तर प्रदेशाने पहिला क्रमांक मिळविला आहे. यामागे योगी आदित्यनाथ सरकारचे प्रयत्न आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी