योगी आदित्यानाथ सरकारची माफियांविरुध्द जोरदार मोहीम, ७०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती केली जप्त

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने माफियांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आत्तापर्यंत माफियांची सातशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. Yogi Adityanath govt cracks down on mafias, seizes assets worth over Rs 700 crore


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने माफीयांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आत्तापर्यंत माफियांची सातशे कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील कासमगंज येथील घटनेनंतर सरकारने माफियांविरुध्द कारवाई सुरू केली आहे. याठिकाणी दारू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर हल्ला करण्यात आला होता. पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांना माफियांनी फरफटत नेले. एका शिपायाचा या हल्यात मृत्यू झाला होता. यानंतर पोलीसांनी माफियांविरुध्द मोहीम सुरू केली.पोलीसांबरोबर झालेल्या चकमकीत माफिया मोती याचा भाऊ एलकार मारला गेला. पळून गेलेल्यांना पकडण्यासाठी राज्यभर मोहीम राबविली जात आहे. पोलीस महासंचालक डी. जी. अवस्थी म्हणाले की, दारू माफियांची आता खैर नाही. जेलमध्ये जाणे किंवा पळून जाणे एवढेच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी माफियांविरुध्द अनेक दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे.

त्यांना अशा प्रकारचा धडा शिकविला जाईल की येथून पुढे पोलीसांवर हल्ला करण्याची त्यांची छाती होणार नाही. त्यांच्यावर कायदेशीरपणे मोठी कारवाई करण्यात येईल.

Yogi Adityanath govt cracks down on mafias, seizes assets worth over Rs 700 crore

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*