शरजील उस्मानी विरोधात योगींच्या यूपीतही गुन्हा; ठाकरे सरकारआधी योगी सरकार कारवाई करण्याची शक्यता

वृत्तसंस्था

लखनौ : एल्गार परिषदेत हिंदूविरोधात गरळ ओकणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानी याच्याविरोधात कारवाईचा फास आता आणखी आवळला जात आहे. महाराष्ट्रात त्याच्या विरोधात संताप उसळल्यानंतर ठाकरे सरकारला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. पण आता लखनऊमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे योगी सरकार लवकरच त्याच्यावर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.Yogi adityanat also commits crime against Sharjeel Osmani

शरजीलच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत तो सगळा हिंदू समाज सडलाय असे म्हणाला होता.स्वतःची जबाबदारी झटकून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून योगींवर टिकास्त्र सोडण्यात आले होते. हिंदुत्वाच्या विरोधातील फॅक्टरी योगींच्या उत्तर प्रदेशात चालते. ती बंद करण्याची जबाबदारी योगींची आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते. पण शरजील हिंदूंना सडलेत असे म्हणून महाराष्ट्रातून निघून गेला. त्याला महाराष्ट्रातच का रोखला नाही, त्याला महाराष्ट्रातच अटक का केली नाही, यावर सामनाने चकार शब्द काढला नाही.

Yogi adityanat also commits crime against Sharjeel Osmani

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*