Violent Farmers Protest : हिंसा करणारे आमचे आंदोलक शेतकरी नाहीत; योगेंद्र यादव यांनी झटकले हात


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी मार्ग आखून देऊन मर्यादित परवानगी दिली होती. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या आंदोलनाला वेळ देण्यात आली होती. याआधीच हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.Yogendra Yadav violece farmer agitation not farmer

सुरुवातीला तीन सीमांमधून दिल्लीत प्रवेश करून हा ट्रॅक्टर मोर्चा पुढे चाललेला होता. मात्र शेतकरी अधिक आक्रमक झाले व हा जत्था लाल किल्याकडे जात असताना पोलीस व आंदोलक भिडल्याचं दिसून आलं.हे आंदोलन आता शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेलं आहे. शेतकऱ्यांनी लाल किल्ला देखील काबीज केल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलकांनी दगडफेक केली, ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. तलवारी देखील उपसण्यात आल्या.

या हिंसाचारावर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि या हिंसाचाराचा निषेध देखील नोंदवला आहे. ‘हिंसा करणारे आमचे आंदोलक नाहीत. आजच्या दिवशी जे घडलं ते घृणास्पद आणि लाजिरवाणं आहे. हिंसा करणं अयोग्य आहे, ‘ असं ते म्हणाले.

Yogendra Yadav violece farmer agitation not farmer

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती