आधी हिंसाचार होऊ देणारे आणि हिंसाचार झाल्यानंतर हात वर करणारे शेतकरी आंदोलनातले “गांधीवादी” नेते!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आजच्या प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलन झाले. ते त्यांच्या नियोजनानुसार हिंसक वळणावर नेले गेले. पोलिसांनी परवानगी दिलेल्या नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर मार्च काढण्यापेक्षा दिल्लीत विविध मार्गांनी घुसून धुडगूस घालण्याचा मनसूबा शेतकरी आंदोलकांनी पुरा करून घेतला… yogendra yadav, rakesh tikait, hanan mullah kept themselves distance from violent farmers agitation

पण या सगळ्या प्रकारात शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांनी धारण केलेला गांधीवादाचा मुकवटा मात्र पुरता गळून पडला… कुठे चोरीचौरातील हिंसाचारानंतर धैर्याने आपले भारतभरातले अहिंसक आंदोलन मागे घेणारे महात्मा गांधी आणि कुठे हे माना वेळावत टीव्ही डिबेटमधले खादीचा मफलर गुंडाळून कुठल्याही आंदोलनात बीच में मेरा चाँदभाई म्हणत घुसणारे “नकली गांधी” योगेंद्र यादवांसारखे नेते.शेतकरी आंदोलन हिंसक होणार. त्यांचे मनसूबे ठीक नाहीत. याची पोलिसांना पुरेपूर माहिती होती. त्यांनी प्रचंड संयमाने परिस्थिती हाताळली. आंदोलकांच्या मनात असूनही आंदोलन फारसे चिघळू दिले नाही. पण जेव्हा आंदोलक शेतकरी तलवारी घेऊन पोलिसांवर धावले, त्यांच्या बंदुका हिसकावून घेऊ लागले.

ट्रॅक्टर बेफाम चालवून आपल्याच आंदोलकाचा बळी घेऊ लागले, त्यावेळी योगेंद्र यादव, राकेश टिकैत, हनन मुल्ला यांच्यासारखे शांततेत आंदोलनाचा दावा करणारे तथाकथित गांधीवादी नेते मागून चिथावणी देत असल्याची वक्तव्ये करीत होते. आणि वरून हिंसाचार करणारे कार्यकर्ते राजकीय पक्षांचे आहेत. ते शेतकरी नाहीत, असे सांगून हात झटकत होते. हिंसक आंदोलक फारस अंगाशी येतेय हे पाहून त्यांनी अखेर सायंकाळी आंदोलन मागे घेण्याची घोषणा करून टाकली. पण तो पर्यंत जो हिंसाचार व्हायचा होता, तो होऊन गेला होता.

हिंसक आंदोलनाची जबाबदारी घ्यायला हे नेते पुढे आले नाहीत. त्या सगळ्यांच्या तोंडी विशेषतः योगेंद्र यादवांच्या तोंडी गांधीवादाची भाषा असते, पण आंदोलनाची जबाबदारी घ्यायची वेळ आली की “नकली गांधीवादी” नेते आज मागे सरकलेले दिसले. त्यात सरकारने त्यांच्यावर आंदोलनाची जबाबदारी टाकून काही कारवाई करू नये, यासाठी ते कातडीबचावू भूमिकेत दिसले.

yogendra yadav, rakesh tikait, hanan mullah kept themselves distance from violent farmers agitation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती