Yashwant Sinha Joined TMC : 3 वर्षांपूर्वी राजकीय संन्यास घेणाऱ्या यशवंत सिन्हांचा तृणमूलमध्ये प्रवेश, वाजपेयींच्या काळात होते केंद्रीय मंत्री

Yashwant Sinha who retired from politics 3 years ago, joined the Trinamool Congress ahead Of WB Assembly Elections

भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिपदी राहिलेले यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलच्या मुख्यालयात त्यांनी डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंदोपाध्याय आणि सुब्रत मुखर्जी यांच्या हजेरीत पक्ष प्रवेश केला. Yashwant Sinha who retired from politics 3 years ago, joined the Trinamool Congress ahead Of WB Assembly Elections


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिपदी राहिलेले यशवंत सिन्हा यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलच्या मुख्यालयात त्यांनी डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंदोपाध्याय आणि सुब्रत मुखर्जी यांच्या हजेरीत पक्ष प्रवेश केला. यानंतर तृणमूलकडून याची माहिती माध्यमांना देण्यात आली.

2014 पासून प्रमुख मोदी विरोधक म्हणून यशवंत सिन्हा ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी बिहार निवडणुकीतही एनडीए सरकारविरुद्ध मोहीम चालवली होती. तथापि, त्यांना यश आले नाही. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यासोबत व्यासपीठावरून प्रचार केला होता.

आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ भाजपमध्ये राहिलेल्या यशवंत सिन्हा यांनी खरे तर तीन वर्षांपूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला होता. परंतु आता वयाच्या या टप्प्यावर त्यांनी राजकारणात पुन्हा उतरण्याचे ठरवले आहे. तृणमूलमध्ये प्रवेश करताच नेहमीप्रमाणेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला.यशवंत सिन्हांचा परिचय

यशवंत सिन्हा मूळचे पाटण्याचे रहिवासी आहेत. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. 1958 मध्ये त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर 1960 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळत 24 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी 1984 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन जनता पक्षाचे सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. चार वर्षांनंतर 1988 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्याच वेळी मार्च 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांची अर्थमंत्री म्हणून नेमणूक झाली. यशवंत सिन्हा यांनी बिहारमधील हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हा मतदारसंघ आता झारखंडमध्ये आहे. 2004च्या लोकसभा निवडणुकीत ते हजारीबाग मतदारसंघातून पराभूत झाले. तथापि, पुढच्या वर्षी 2005 मध्ये ते पुन्हा संसदेत पोहोचले. यानंतर 2009 मध्ये त्यांनी भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Yashwant Sinha who retired from politics 3 years ago, joined the Trinamool Congress ahead Of WB Assembly Elections

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती