यशोमती ठाकूर यांनी केला जिल्हाधिकारी म्हणून सत्कार, पण संबंधित महिला लोकसेवा आयोगाची परीक्षा पासच झाली नाही


सवंग प्रसिध्दीसाठी मंत्रीपदावरील व्यक्तीकडूनही पूर्ण माहिती घेतली जात नसल्याने काय फजिती होते याचे उदाहरण महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबाबत घडले आहे. जिल्हाधिकारी झाली म्हणून त्यांनी सत्कार केलेली महिला लोकसेवा आयोगाची परीक्षाच उत्तीर्ण झालेली नाही.Yashomati Thakur felicitated as the District Collector the examination of the concerned Women Public Service Commission


प्रतिनिधी

अमरावती : सवंग प्रसिध्दीसाठी मंत्रीपदावरील व्यक्तीकडूनही पूर्ण माहिती घेतली जात नसल्याने काय फजिती होते याचे उदाहरण महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याबाबत घडले आहे. जिल्हाधिकारी झाली म्हणून त्यांनी सत्कार केलेली महिला लोकसेवा आयोगाची परीक्षाच उत्तीर्ण झालेली नाही.

आपल्या जिल्ह्याची लेक जिल्हाधिकारी झाली म्हणून पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही संबंधित महिलेच्या गावी जात सत्कार केला होता. मात्र, माधुरी गजभिये या महिलेचं नाव केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत नसल्याचे आता समोर आलं आहे.व्हॉटसअ‍ॅपवरील मेसेजला खरे मानून शेतकऱ्याची मुलगी आणि गवंडी काम करणाऱ्याची पत्नी जिल्हाधिकारी झाल्याचे कौतुक संपूर्ण जिल्ह्याला होते. पण संबंधित महिला जिल्हाधिकारी झालीच नसल्याचं आता समोर आलं आहे.

अमरावती जिल्ह्यातील माधुरी गजभिये ही महिला जिल्हाधिकारी झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2019च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत माधुरी गजभिये या महिलेचं नावच नसल्याची माहिती आता समोर आलीय.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या गावातील मुलगी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार म्हणून तिल्या शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी होर्डिंग्स लावले होते. पण संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर आता हे होर्डिंग्स गुंडाळून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Yashomati Thakur felicitated as the District Collector the examination of the concerned Women Public Service Commission

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती