भारत रस्ते अपघातात जगात पहिल्या क्रमांकावर; केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची चिंता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत रस्ते अपघातात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हव्यात,’ असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.world in road accidents Union Transport Minister Nitin Gadkari’s concern

इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित ‘रोड सेफ्टी चॅलेंजेस इन इंडिया अँड प्रिपरेशन ऑफ ॲन ॲक्शन’ या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.ते म्हणाले, देशभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूच्या बातम्या वाचतो. पण, तरीही या दुर्घटना कमी होताना दिसत नाहीत. भारतातल्या या रस्ते अपघातांबाबत गडकरी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

भारतात दररोज 415 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. त्यापैकी बहुतांश जण 18 ते 45 वयोगटातील असतात. दरवर्षी 1.5 लाख जणांना प्राण गमवावे लागत असून 4.5 लाख लोक जखमी होत आहेत. सध्या भारत रस्ते अपघातात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हवी,’ असा इशारा गडकरी यांनी दिला.

world in road accidents Union Transport Minister Nitin Gadkari’s concern

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*