Workers work only 4 days a week, 3 days off; Modi government likely to issue notification soon

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! चार दिवस दररोज बारा तास काम केल्यास आठवड्याला तीन दिवसांची सुट्टी… मोदी सरकार देणार कंपन्यांना मुभा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कामगारांना 3 दिवसांच्या रजेची तरतूद आणण्याच्या विचारात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिसूचना जारी केली जाऊ शकते. संसदेने कामगारांशी संबंधित चार विधेयके गतवर्षी मंजूर केली होती. मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये वेतन संहिता ते सामाजिक सुरक्षा या विषयांचा समावेश होता. Workers work only 4 days a week, 3 days off; Modi government likely to issue notification soon


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कामगारांना 3 दिवसांच्या रजेची तरतूद आणण्याच्या विचारात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिसूचना जारी केली जाऊ शकते. संसदेने कामगारांशी संबंधित चार विधेयके गतवर्षी मंजूर केली होती. मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये वेतन संहिता ते सामाजिक सुरक्षा या विषयांचा समावेश होता.

कामगार मंत्रालयाने संसदेने मंजूर केलेल्या चार विधेयकांची अंमलबजावणी करण्याचे नियम जवळजवळ तयार केले आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार कामगारांना आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवसांची सुटी देण्याचा सरकार विचार करत आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपन्या आणि संस्थांना हा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल. हा पर्याय स्वीकार करणे अथवा रद्द करण्यावर त्यांचे मत विचारात घेतले जाईल. पर्याय निवडणाऱ्या कंपन्या आठवड्यातून चार दिवस आपल्या कामगारांकडून 12 तास काम घेण्याची सूट असेल, उर्वरित 3 दिवस मात्र त्यांना कामगारांना सुटी द्यावी लागेल.तथापि, नियमावलीत हे स्पष्ट करण्यात येईल की, कंपन्या आणि कामगारांच्या संयुक्त सहमतीनेच हा पर्याय निवडण्याची तरतूद आहे. यामुळे एखाद्या संस्थेत काम करणार्‍या कामगारांसाठी एकसमान व्यवस्था अवलंबली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या संस्थेने नवी प्रणाली लागू केली तर ती सर्व कामगारांना समान लागू करावी लागेल. चार कामगार कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नियमावलीच्या मसुद्यावर संबंधितांचे मत जाणून घेतले होते. कायद्याचे नियम समोर आल्यानंतर केवळ काही औद्योगिक संस्थांनीच नवीन यंत्रणेनुसार पर्याय देण्याचा सल्ला दिला. अधिकाऱ्यांच्या मते, सरकार त्यांच्या या सूचनांना नियमावलीत समाविष्ट करण्याच्या विचारात आहे.

Workers work only 4 days a week, 3 days off; Modi government likely to issue notification soon

Workers work only 4 days a week, 3 days off; Modi government likely to issue notification soon

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*