महिला फाटक्या जीन्स घालतात…हे कसले संस्कार? उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी व्यक्त केली चिंता

  • आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलं आहे.
  • संस्कारीत मुले जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत .
  • त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर योग्य संस्कार करणे पालकांची जबाबदारी आहे.

विशेष प्रतिनिधी

हरिद्वार: उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत सातत्याने चर्चेत असतात. आधी अचानक मुख्यमंत्री होण्यावर जोरदार चर्चा झाली आणि आता तिरथसिंग रावत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. Women wear ripped jeans what a rite of passage

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले आहे की आजकाल स्त्रिया फाटलेल्या जीन्स घालत आहेत, हे सर्व योग्य आहे का?… हे कसले संस्कार आहेत? बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्या हस्ते झाले या दरम्यान ते बोलत होते .ते म्हणाले की मुलांवर संस्कार कसे होतात हे पालकांवर अवलंबून असते.यासाठी त्यांनी एक दाखला देखील दिला , ‘मी एकदा जहाजातून प्रवास करत होतो, तेव्हा तिथे एक महिला आपल्या २ मुलांसोबत होती, आणि तिने फाटलेली जीन्स घातलेली. मी जेव्हा तिला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा तिने सांगितलं की मी दिल्लीला जात आहे. माझे पती JNU मध्ये प्राध्यापक आहेत, आणि मी एक NGO चालवते.’

पुढे रावत म्हणाले, ‘तेव्हा मी विचार केला की, जर NGO चालवणारी महिला असे कपडे परिधान करत असेल, तर ती समाजाला कशाप्रकारे संस्कार घडवेल? आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं कधीच नसायचं. मुलांवर कसे संस्कार होतायत, हे सर्वस्वी पालकांवर असतं, असंही मुख्यमंत्री रावत यांचं मानणं आहे. आपल्या देशातील युवक हे पाश्चात्य संस्कृती आपलीशी करतायत, हे चिंताजनक आहे, अशी भीतीही रावत यांनी व्यक्त केली.

Women wear ripped jeans what a rite of passage

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*