महिला उमेदवारावर ‘आयटम’ म्हणणाऱ्या कमलनाथांवर सोनिया, प्रियांका आता कारवाई करणार का?

मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराला उल्लेखून त्यांनी आयटम असा शब्दप्रयोग केला. महिलांच्या सन्मानाबाबत सातत्याने बोलणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी आता कमलनाथ यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न केला जात आहे.


वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आयटम असा उल्लेख त्यांनी या महिलेचा केला आहे. महिलांच्या सन्मानाबाबत सातत्याने बोलणाऱ्या कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी आता कमलनाथ यांच्यावर काय कारवाई करणार असा प्रश्न केला जात आहे.

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीतील प्रचारसभेदरम्यान कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल असभ्य भाषेत टीका केलीय. यामुळे कमलनाथ हे वादात सापडले आहेत.

डबरा येथील कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी कमलनाथ आले होते. यावेळी कमलनाथ यांनी प्रचारसभेत भाषण केलं. ‘सुरेंद्र राजेश हे आमचे उमेदवार आहेत. ते चांगल्या स्वभावाचे आहेत. हे त्यांच्यासारखे नाही, काय नाव त्यांचे? (इम्रती देवी, माजी राज्यमंत्री) मी काय त्यांचं नाव घेऊ. माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना चांगलं ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवं होतं. ‘ही काय आयटम आहे’, असं कमलनाथ म्हणाले.

इम्रती देवी या माजी आमदार आहेत. इम्रती देवी यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. इम्रती देवी या भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदेंच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. भाजपने कमलनाथ यांच्याविरोधात या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. ‘कमलनाथ जी! इम्रती देवी या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं नाव आहे. त्यांनी खेड्यात मजुरी करण्यापासून त्यांच्या कामाला सुरवात झाली आणि आता लोकसेवक म्हणून देश-उभारणीला पाठिंबा देत आहेत. कॉंग्रेसने मला ‘भुकेलेला-नग्न’ असं संबोधलं आणि एका आता महिलेला ‘आयटम’ सारखे शब्द वापरुन पुन्हा आपल्या भांडवलशाही विचारसरणी उघडी केली’, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले.

जे स्वत:ला ‘मयार्दा पुरुषोत्तम’ असं समजतात ते अशी ‘अश्लील भाषा’ वापरत आहेत? नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर देशात नारीची पूजा केली जात आहे, अशा प्रकारे तुमच्या वक्तव्यातून तुमची घाणेरडी मानसिकता दिसून येते आहे. कमलनाथ यांन इम्रती देवीसह राज्यातील प्रत्येक मुलीची माफी मागावी हेच योग्य असेल, असे चौहान यांनी म्हटले आहे.

कमलनाथ यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेसचे माजी नेते आणि विद्यमान भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी टीका केली आहे. एक गरीब आणि दलित कुटुंबातून आलेल्या इम्रती देवी यांना ‘आयटम’ आणि ‘जलेबी’ म्हणणे अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. ही कमलनाथ यांची मानसिकता दर्शवते. महिलांसह संपूर्ण दलित समाजाचा अपमान करणाऱ्या अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून म्हटलंय.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*