मोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी नॅशनल बँक स्थापन करणार ; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल बँक स्थापनेचा निर्णय घेतला आहे. मोठ्या पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी ही बँक काम करणार आहे. या बँकेला विकास वित्त संस्था, असे नाव दिले आहे. Will set up a National Bank to fund large projects; Decision of the Union Cabinet

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात अशी बँक स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता मंत्रिमंडळानेच बँकेला मंजुरी दिल्याची माहिती सीतारमण यांनी दिली. या बँकेसाठी बोर्ड स्थापन होणार आहे. सरकारकडून सुरुवातीला 20 हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

बॉन्ड जारी करून गुतंवणूक :

या बँकेकडून बॉन्ड जारी करून गुतंवणूक केली जाणार आहे, अशी देण्यात आली.भविष्यात 3 लाख कोटी जमवण्याचे उद्दीष्ट्य आहे. यात गुतंवणूक करणाऱ्यांना कर सवलतही मिळणार आहे. यात मोठे सॉवरेन फंड, पेन्शन फंड गुंतवणूक करू शकतात.बँकेच्या बोर्ड सदस्यांसाठी तज्ज्ञांचा समावेश :

कोणतीही जुनी बँक मोठ्या प्रकल्पांसाठी निधी देण्यास तयार होत नव्हती. सुमारे 6 हजार ग्रीन ब्राऊन फीलेड प्रजोक्टला निधीची गरज आहे. त्यामुळे यासाठी नॅशनल बँक स्थापनेचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या बँकेच्या बोर्ड सदस्यांसाठी नामवंत तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे.

सर्व बँकांचे खासगीकरण नाही :

देशातील सर्व बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नाही, असेही सीतारमण यांनी स्पष्ट केले. देशात एसबीआयसारख्या बँका हव्यातच. बाजारातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही वित्तीय विकास संस्था स्थापन होणारआहे. ज्या बँकांचे खासगीकरण होत आहे, त्यातील कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि भविष्य याबाबत काळजी घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. त्यांच्या आजीने बँकांचे राष्ट्रीयकरण केले असले तरी काँग्रेसने फक्त भ्रष्टाचाराचे राष्ट्रीयकरण केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. फक्त आरोप करणे हेच राहुल गांधी यांचे काम असल्याचे त्या म्हणाल्या.

Will set up a National Bank to fund large projects; Decision of the Union Cabinet

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*