Will railway stations be handed over to private companies? Piyush Goyal answered this question in Parliament

रेल्वे स्थानकेही खासगी कंपन्यांना देणार का? या प्रश्नावर पीयूष गोयल यांनी संसदेत दिले हे उत्तर

रेल्वे मंत्रालयाचा रेल्वे स्थानके खासगी क्षेत्राकडे देण्याचा कोणताही हेतू नसल्याचे रेल्वेने बुधवारी म्हटले असून या स्थानकांची मालकी रेल्वेकडेच राहील. लोकसभेत संगम लाल गुप्ता यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सार्वजनिक- खासगी भागीदारी अंतर्गत खासगी क्षेत्राच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालय रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहे. Will railway stations be handed over to private companies? Piyush Goyal answered this question in Parliament


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाचा रेल्वे स्थानके खासगी क्षेत्राकडे देण्याचा कोणताही हेतू नसल्याचे रेल्वेने बुधवारी म्हटले असून या स्थानकांची मालकी रेल्वेकडेच राहील. लोकसभेत संगम लाल गुप्ता यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सार्वजनिक- खासगी भागीदारी अंतर्गत खासगी क्षेत्राच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालय रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करत आहे.

दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्री म्हणाले की, हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गोमतीनगर स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. नागपूर, अमृतसर, साबरमती, ग्वाल्हेर, पुडुचेरी, तिरुपती, नेल्लोर आणि देहरादून या आठ रेल्वे स्थानकांची पात्रता विनंती अंतिम करण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.गोयल म्हणाले की, नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई आणि केरळातील एर्नाकुलम या तीन रेल्वे स्थानकांसाठी पात्रता विनंती मागवण्यात आल्या आहेत. सफदरजंग आणि अजनी (नागपूर) स्थानकांच्या पुनर्विकासासाठी कंत्राट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, रेल्वे ही भारताची मालमत्ता आहे आणि तिचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, रेल्वेमार्फत अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. अशा कामांसाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक देशाच्या हितासाठी असेल, असेही ते म्हणाले.

Will railway stations be handed over to private companies? Piyush Goyal answered this question in Parliament

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*