आसामातील भाजपचे ‘चाणक्य’ हिमांता बिस्वा शर्मा होणार का मुख्यमंत्री?


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी – भाजपचे हिमांता बिस्वा शर्मा यांच्याकडे सध्या केवळ आसामचेच नव्हे तर दिल्लीचेही लक्ष लागून राहिले आहे. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास कदाचित मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकेल अशा अटकळी बांधल्या जात आहेत. Will Hemanata Biswa become CM of Assam

हिमांता बिस्वा शर्मा यांना आसाममध्ये भाजपचे चाणक्य असे म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पूर्वोत्तर भागात कमळ फुलले आहे. शर्मा हे आक्रमक राजकारण करतात. कॉंग्रेसमधून राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे शर्मा यांना अपेक्षेप्रमाणे सन्मान मिळाला नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये दाखल झाले. २०१६ मध्ये त्यांनी शर्मा यांच्या रणनितीनुसार भाजप मैदानात उतरले आणि कॉंग्रेसचा दारुण पराभव केला.हिमांता बिस्वा हे सध्या आसाममधील भाजपचे मोठ्या नेत्यांपैकी एक मानले जात आहेत. भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली तर सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, असा तर्क बांधला जात आहे. शर्मा यांची लोकप्रियता वाढत चालली असून भाजपने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले तर आश्चवर्य वाटणार नाही.

आसाममध्ये भाजपच सरकार स्थापन करेल, असा दावा शर्मा यांनी केला आहे. कॉंग्रेस आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच बदरुद्दीन अजमल यांच्या आघाडीने भाजपला फायदा मिळणार आहे. राज्यात ९० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वामस शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

Will Hemanata Biswa become CM of Assam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती