अहिल्यादेवींचे इतकेच प्रेम आहे तर धनगर समाजाला आरक्षण का मिळवून दिले नाही? सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना सवाल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी शरद पवार यांना इतकेच प्रेम आहे तर आजपर्यंत त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवगार्तील आरक्षण का मिळवून दिले नाही, असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. Why you failed to give reservation to Dhangar community? Sadabhau Khot asked Sharad Pawar

सांगली येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना सवाल करताना खोत म्हणाले, तुम्ही 50 वर्षे सरकारमध्ये होता, मग ही गोष्ट का जमली नाही. आतादेखील तुम्ही राज्यात सत्तेत आहात. मग धनगर समाजाला एसटी प्रवगार्चे आरक्षण देणे तुम्हाला का जमत नाही.जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरण्यात आला, असा सवाल करून खोत म्हणाले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले. जर मेंढपाळाच्या मुलाने त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर शरद पवार यांनी स्वत:च्याच हस्ते उद्घाटन करण्याचा हट्ट का धरला? हा मुद्दा केवळ पुतळ्याचा उद्घाटनाचा नाही. धनगर समाजाला फसवले गेल्यामुळे तो संतप्त झाला आहे. हीच फसवणारी माणसं आमच्या दैवताचं गुणगान गाणार असतील तर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे वेडे पीर दोन हात करायला उभे राहतील.

गेल्यावेळी भाजपची सत्ता होती तेव्हा धनगराच्या वेषात येऊन आरक्षण द्या, अशी मागणी करत होतात. आता राज्याची सत्ता या लोकांच्या हातात आहे. तेव्हा धनगर समजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी करून खोत म्हणाले, अजून दोन-चार पुतळे उभे करा आणि त्यांचे उद्घाटन करा. त्यासाठी कोणीही नाही म्हणालेले नाही.

गोपीचंद पडळकर हा बारका गडी आहे, पण राज्यभरात त्यांची चर्चा सुरु आहे. पडळकर फक्त टीव्हीवर आले की लोक बघतात. आता पडळकर कोणाला काय बोलणार, याची लोकांना उत्सुकता असते, अशा शब्दांत त्यांचे कौतुकही खोत यांनी केले.

Why you failed to give reservation to Dhangar community? Sadabhau Khot asked Sharad Pawar

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी