नव्या भारतात मोगल शासकांच्या नावाची गरजच काय? अयोध्येतील मशीद स्वातंत्र्यसेनानी अहमदुल्ला शाह यांच्या नावाने समर्पित


स्वतंत्र आणि लोकशाही असलेल्या नव्या भारतात मोगल शासकांची आठवण काढायची गरजच काय? त्यामुळे अयोध्येजवळ बनत असलेल्या मशीदीला बाबरासहित कोणत्याही मोगल शासकाचे नाव दिले जाणार नाही. १८५७ च्या स्वांतंत्र्यलढ्यातील सेनानी अहमदुल्ला शाह यांचे नाव या कॉम्प्लेक्समधील इमारतीला दिले जाणार आहे. Why the name of Mughal rulers in New India?


वृत्तसंस्था

लखनऊ : स्वतंत्र आणि लोकशाही असलेल्या नव्या भारतात मोगल शासकांची आठवण काढायची गरजच काय? त्यामुळे अयोध्येजवळ बनत असलेल्या मशिदीला बाबरासहीत कोणत्याही मोगल शासकाचे नाव दिले जाणार नाही. १८५७ च्या स्वांतंत्र्यलढ्यातील सेनानी अहमदुल्ला शाह यांचे नाव या कॉम्प्लेक्समधील इमारतीला दिले जाणार आहे.अयोध्येत बनत असलेल्या मशीदीला मोगल शासकाचे नाव देणार नाही, असा निर्धार इंडो इस्लामिक कल्चरल रिसर्च फाऊंडेशनने केला आहे. ही मशीद १८५७ च्या उठावातील ज्येष्ठ स्वांतंत्र्यसेनाी अहमदुल्ला शाह उर्फ मौलवी फैजाबादी यांच्या नावाने समर्पित केली जाणार आहे. मात्र, त्यांचे नाव मशीदीला दिले जाणार नाही. धन्नीपूर मशीद असेच नाव असणार आहे.

अयोध्येतील धन्नीपूर गावातील पाच एकर जमीनीवर मशीद बनणार आहे. मात्र, या संपूर्ण कॉम्प्लेक्सला कोणत्याही मोगल शासकाचे नाव दिले जाणार नाही, असे इंडो इस्लामिक कल्चरल सेंटरतर्फे सांगण्यात आले आहे. राम मंदिर- बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांना धन्नीपूर येथे मशीद बनविण्यासाठी पाच एकर जागा दिली आहे. मशीदीच्या पायाभारणीसाठी सुन्नी वक्फ बोर्डकडून इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडे जबाबदारी दिली आहे. फाऊंडेशनने घेतलेल्या निर्णयानुसार मशीद कॉम्प्लेक्समध्ये बनणाऱ्या कोणत्याही इमारतीला मोगल शासकाचे नाव दिले जाणार नाही.

फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले की आता मंदिर-मशीद वाद पूर्णपणे संपला आहे. आता आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांसाची माहिती नवीन पिढ्यांना व्हावी हा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही निर्णय घेतला आहे की ही मशीद बाबर किंवा कोणत्याही दुसऱ्या मोगल शासकाच्या नावाने असणार नाही. अनेकांना कदाचित वाटत असेल की या मशीदीला बाबराचे नाव दिले जाईल. मात्र, आता आपण नव्या भारतात राहत आहोत. मोगल शासकांची आता आठवण काढायचे कारणच काय?

१८५७ च्या स्वांतंत्र्यलढ्यात बंडाचा बिगूल फुंकणारे अहमदुल्ला शाह यांच्या नावाने ही मशीद समर्पित केली जाणार आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अहमदुल्ला शाह हे फैजाबाद (अयोध्या) येथीलच रहिवासी होते. त्यामुळेच त्यांना मौलवी फैजाबादी असेही म्हटले जाते. अयोध्येत बनत असलेले हे मशीद कॉम्प्लेक्स सांप्रदायिक सद्भाव आणि देशभक्तीचे प्रतिक बनावे असाही इंडो इस्लामिक फाऊंडेशनचा मानस आहे. त्यामुळेच शाह यांच्यासारखा देशभक्त आणि सच्चा इस्लामी अनुनयाच्या नाव या कॉम्प्लेक्सला दिले जाणार आहे.

Why the name of Mughal rulers in New India?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था