कर्नाटकात लसीकरणाचा वेग कमी का? मोदींनी भर बैठकीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना खडसावले!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपशासित कर्नाटकात कोरोना लसीकरणाचा वेग कमी का आहे. को-विन पोर्टलवर नोंदणी झालेली 70 टक्के लसीकरण केंद्रे कार्यान्वित का नाहीत, असा प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना फैलावर घेतले. Why is vaccination slow in Karnataka? Modi scolds Chief Minister Yeddyurappa in full meeting!

पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच बंगळूर शहर, बिदर आणि कलबुर्गी या जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याने तेथे कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. 2 हजार 42 रुग्णालयांनी लसीकरणासाठी को-विन अॅपवर नोंदणी केली. यातील 1 हजार 439 केंद्रावर लसीकरण सुरूच झालेले नाही. याबाबत मोदींनी येडियुरप्पांना जाब विचारला.या बैठकीनंतर येडियुरप्पा म्हणाले की, कोरोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवणार आहे. त्यांची क्षमता दिवसाला 1 लाखांवर नेण्यात येईल. 3 हजार 500 नवी केंद्रे सुरू करून दररोज 3 लाख नागरिकांना लस देण्यात येईल. 1 हजार 439 लसीकरण केंद्रे पंतप्रधानांच्या सूचनेनुसार लगेच सुरू करण्यात येतील.

Why is vaccination slow in Karnataka? Modi scolds Chief Minister Yeddyurappa in full meeting!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*