श्रीराम म्हंटल्यावर चीड का येते ? ममता दिदींच्या वागणुकीवर टिव्ही वरील ‘ प्रभू श्रीराम ‘ नाराज


विशेष प्रतिनिधी  

कोलकत्ता : कोलकात्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला.यावरुन प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. Why do you get annoyed when you say Shriram? ‘Prabhu Shriram’ on TV is upset over Mamta Didi’s behavior

अरूण गोविल यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी श्री रामाचं नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?असा सवाल अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जींना केला आहे.अरुण गोविल म्हणाले की,”श्री राम मनुष्यासाठी एक आर्दश आहेत. रामाचं जीवन प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणा आहे. श्री रामांच्या नावानं चिडनं किंवा विरोध करन हे सगळं मनुष्य जातीच्या विरोधात आहे. या देशात कोण आहे ज्यांनी प्रभु श्री रामाचं नाव ऐकलं नसेल.”

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचं भाषण सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे . तसंच त्यावर वाद-विवादही सुरु झाले आहेत.

Why do you get annoyed when you say Shriram? ‘Prabhu Shriram’ on TV is upset over Mamta Didi’s behavior

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती