कोराना लसीवरून राजकारण कशाला करता? अनेक व्यासपीठे आहेत तेथे या, दोन हात करू, अमित शहा यांचे विरोधकांना आव्हान


कोरोना लसीवरुन जे लोक राजकारण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारण करण्यासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या, दोन हात करु. लोकांच्या आरोग्याशी निगडीत गोष्टी आहेत. आपले शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन लस बनवली आहे. त्यावर का राजकारण करत आहात? असा सवाल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना लसीवरुन जे लोक राजकारण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारण करण्यासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या, दोन हात करु. लोकांच्या आरोग्याशी निगडीत गोष्टी आहेत. आपले शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन लस बनवली आहे. त्यावर का राजकारण करत आहात? असा सवाल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे. Why do politics on the Korana vaccine? There are many platforms, let’s do it with both hands, Amit Shah’s challenge to the opposition

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आसामची राजधानी गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे जवान आणि त्यांच्या परिवारासाठी आयुष्यान भारत योजनेची सुरुवात केली. यावेळी बोलताना शहा म्हणाले, राजकारणासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या दोन हात करु.शहा म्हणाले की, जवानांसाठी योजना सुरु करण्यासाठी आजसारखा दुसरा दिवस असू शकत नाही. सुभाष बाबू असं व्यक्तीमत्व होतं की, ज्यांना कुणी अवॉर्ड दिला नाही. जनता त्यांच्याशी नेताजीचा सन्मान जोडून त्यांचं स्मरण करते. नेताजींनी नारा दिला होता, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूॅँगा. हा नारा देशातील युवकांसाठी आजही चेतना आणि उत्साह भरतो. राष्ट्रभक्ती जागृत करतो. आयुष्मान योजनेद्वारे देशभरातील 10 लाख जवान आणि अधिकारी आणि 50 लाखाच्या आसपास त्यांचा परिवार देशातील 24 हजार रुग्णालयांमध्ये फक्त कार्ड स्वॅप करुन उपचार घेऊ शकणार आहेत.

शहा म्हणाले की, 2022 पर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलिस बलातील कर्मचाऱ्यांचे समाधान 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण 36 टक्के होतं. तर 2024 पर्यंत ते 65 टक्के करायचं आहे. पाच वर्षात निवृत्त होणाऱ्या प्रत्येक जवानाच्या जागी भरती केली जाईल. त्यामुळे प्रत्येक जवान वर्षातील 100 दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकेल.

Why do politics on the Korana vaccine? There are many platforms, let’s do it with both hands, Amit Shah’s challenge to the opposition

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था