महाराष्ट्रातील शेतकरी फळांचे केक्स का बनवत आहेत ? ग्रामीण महाराष्ट्रात सुरू झाली एक नवी मोहिम!

  • आपण फळे पिकवतोय, पण पुरेशा प्रमाणात खात नाहीत. आपल्या रोजच्या आहारात फळे-भाज्या सॅलड्स घेत नाहीत, त्यामुळे सर्वप्रथम खप वाढवणे या भावनेतून वाढदिवसाला केकऐवजी फळे उपक्रमाला गती मिळाली.

  • सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉट्सअप या चळवळीचे वाहक आहेत. हे एक विधायक आंदोलन आहे, जे पारंपरिक मीडिया, सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांच्या पाठिंब्याशिवाय सुरू झाले आहे.

  • ‘होय आम्ही शेतकरी समूहा’ने त्यांच्या फेसबूक पेजवर फळांच्या केकची स्पर्धा जाहीर केली असून, आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत. कलिंगड कापण्यापासून सुरू झालेला हा पायंडा अधिक टिकावू, शाश्वत कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

  • इंटरनेटवर अशा 100% फ्रुट्स केकबाबत माहिती उपलब्ध आहे. अशा डिझाईन लवकरच शेतकऱ्यांच्या घराघरात दिसतील. Why are farmers in Maharashtra making fruit cakes? A new campaign has started in rural Maharashtra!

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल येथील कृष्णत पाटील यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या संदेशाने साजरा केला. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेकरीमधून केक मागवण्याऐवजी टरबूज, अननस, द्राक्षे आणि केशर वापरुन केक तयार केला. हा संदेश जोरदार आणि स्पष्ट होता शेतकर्यांनी स्वत:च केक बनवावे आणि बाजारपेठ देखील तयार करावी.

लॉकडाऊनमुळे अलिकडच्या काळात फळ उत्पादकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे आणि आता लॉकडाऊनची आणखी एक मालिका असल्याचे सांगून व्यापारी कमी दराने उत्पादन खरेदी करत आहेत. शेतकर्‍यांना उत्पादनाला सर्वात कमी भाव मिळत असून त्यामुळे काही शेतकर्यांनी फळांच्या केकचा हा ट्रेंड सुरू केला आहे. हा ट्रेंड सोशल मीडियावर जोर धरत आहे आणि शेतकर्‍यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे कृषी विश्लेषक दीपक चव्हाण सांगतात.

नाशिकमधील शेतकरी हरीभाऊ महाजन यांनी वाढदिवसानिमित्त सांगितले की फक्त वाढदिवसच नाही तर सर्वच प्रसंग अशाच प्रकारे साजरे केले पाहिजेत.ग्रामीण महाराष्ट्रात एक अपूर्व घटना घडतेय, एका जटील समस्येबाबत अंतर्मुख होत शेतकरी समाज व्यक्त होतोय, प्रतिसाद देतोय. एक नवं लोण गावोगावी पसरतेय ,आजच्या भाषेत व्हायरल होतंय.वाढदिवसाला केक कापायाचा नाही, तर केकसारखीच ताज्या फळांची रचना करायची आणि फळे कापून वाढदिवस साजरा करायचा! एक नवा पायंडा, नवी पद्धत रूजवण्याच्या निर्धाराने गावोगावी मित्र-नातेवाईकांत असे फळांच्या केकचे फोटो शेअर केले जात आहेत.

खासकरून बच्चे कंपनी खूश होईल, अशाप्रकारे टरबजू-खरबूज, द्राक्षे, सफरचंद, संत्री, डाळिंबे, केळी यासह स्ट्रॉबेरी, किवी, अननस आदी फळांची निवड व मांडणी डिझाईन केली जात आहे.

या व्हायरल ट्रेंडची पार्श्वभूमी अशी की, चालू महिन्यात द्राक्षे, केळी, टरबूज-खरबूज अशा सर्वच हंगामी फळांची कमी कालावधीत मोठी पुरवठावाढ झाली. परिणामी बाजारभाव गडगडलेत. अशातच लॉकडाऊनच्या धास्तीमुळे व्यापाऱ्यांकडून कमी दराने बोली लागणे, निर्यातीसाठी कंटेनर शॉर्टेज आदी समस्यांची भर पडत गेली. किरकोळ विक्रीत फळे चढ्या दरात विकली जात असली तरी फार्मगेट किंमती उत्पादन खर्चाच्या खाली पोचलेल्या. अशा बिकट स्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी वाढदिवसाला केकऐवजी फळांचा पर्याय पुढे आणला आणि टायमिंग जुळल्याने गावोगावी पसरला.

गेल्या हंगामात सीताफळ, पेरू, डाळिंब आदी फळांनाही बाजार मिळाला नव्हता. त्यामुळे सर्वच फलोत्पादक या ट्रेंडला प्रतिसाद देत आहेत.

एका समस्येबाबत असे वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं खूपच सूचक आहे, नेमकं कुठे चुकतंय आणि उपाय काय? यासंदर्भात एक सामूहिक प्रतिसाद म्हणजे हा पायंडा . असा पायंडा खरोखरच रूजला, तर भविष्यात नवे बदल होण्याच्या दृष्टिने खूप आशादायक चित्र नक्कीच दिसेल.

Why are farmers in Maharashtra making fruit cakes? A new campaign has started in rural Maharashtra!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*