अंबानींसारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता का? राम कदम यांचा शिवसेनेला सवाल

अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केला आहे. Whose intention was it to scare industrialists like Ambani and raise funds for municipal elections? Ram Kadam’s question to Shiv Sena


विशेष प्रतिनिधी

मुंबई: अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींना घाबरवून पालिका निवडणुकीसाठी निधी गोळा करणं कोणाचा हेतू होता? शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष वाझे यांची उघड वकिली का करत आहेत? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

वाझे यांचा बचाव कशासाठी केला जात आहे? गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीला वाचवणं योग्य आहे का? असा सवाल करून कदम म्हणाले, महाराष्ट्र सरकार निवडणुकीसाठी निधी गोळा करतंय का? या दिशेनं तपास करण्याची हिंमत दाखवली जाणार का? या दृष्टीनं तपास व्हावा अशी आमची मागणी आहे.कोट्यवधी लोकांना रोजगार देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं कारण काय? एक साधारण एपीआय दजार्चा अधिकारी इतकं मोठं षडयंत्र एकटा रचू शकतो का?

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. मात्र एनआयएनं त्यांना अटक केली. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंची पाठराखण केली होती. आता वाझेंच्या अटकेनंतर भाजपनं शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

Antilia Case: Sachin Waze finally suspended, petition challenging arrest Will Be heard in Mumbai High Court today
Antilia Case: Sachin Waze finally suspended, petition challenging arrest Will Be heard in Mumbai High Court today

Whose intention was it to scare industrialists like Ambani and raise funds for municipal elections? Ram Kadam’s question to Shiv Sena

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*